नांदेड (प्रतिनिधी)- दिवाळी व इतर सणांच्या कालावधीत प्रवासी मोठया प्रमाणात गावी येत व जात असतात. अशा कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे प्रवासी बस धारकामार्फत घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. 26 ऑक्टोबर 2021 रोजीच्या राज्य महामंडळाच्या भाडेदराच्या तुलनेत कंत्राटी परवाना वाहनांना कि.मी.प्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले आहे. कंत्राटी वाहतुकदार प्रवासी भाडयापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या ईमेल dycommr.enf2@gmail.com व rto.26-mh@gov.in वर तक्रार नोंदवावी. त्यामध्ये आपले नावे, मोबाईल क्रमांक, तिकीट, प्रवासाचा तपशील याची माहिती देण्यात यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
Related Posts
मन पर बोझ लेकर मेरा गोपी हमे छोड चला गया…
यह सब तस्वीरें गोपाल के फेसबुक पेज से ली गई है! मेरा गोपीकिशन, मेरा गोपाल, या मेरा गोपी, नाम कुछ…
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य-कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
नांदेड (प्रतिनिधी)-स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उच्च शिक्षणामध्ये क्रांतिकारक असा बदल होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० पुढच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठे व संलग्नित सर्व…
पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर 13 ते 17 मार्च दरम्यान नांदेड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी करणार
नांदेड(प्रतिनिधी)-नुतन पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.शशिकांत ह.महावरकर हे दि.13 मार्चपासून 17 मार्च दरम्यान नांदेड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी करणार आहेत. नुतन…