नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नांदेड उत्तर जिल्हा कार्यकारणी जाहीर करणारे प्रसिध्द पत्रक वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याचे संघटनात्मक काम सक्षमपणे आणि वेगवान पध्दतीने होण्यासाठीचे नियोजन करून नांदेड जिल्ह्यांचे भौगोलिक सिमांकन निश्चित करण्यात आले आहे. नांदेड, उत्तर व नांदेड दक्षीण असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. त्यामध्ये नांदेड उत्तर मध्ये माहूर, किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, अर्धापूर, हदगाव आणि नांदेड उत्तर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नांदेड उत्तर जिल्हा कार्यकारणीमध्ये जिल्हाध्यक्ष-राजेश हत्तीअंबीरे पालमकर, उपाध्यक्ष- नंदन विठ्ठल नांगरे, उपाध्यक्ष-गंगाधर रामचंद्र पाटील, महासचिव-शैलेश मारोतराव लवटे, सहसचिव-माधव विठ्ठल पांडे आणि सदस्य स्वरुपात कपील गौतम वावळे, विश्र्वकांत मिलिंद एडके, अनिल भिमराव झिने, राजू बालाजी एडके, राम नरवाडे यांचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीची नांदेड उत्तर जिल्हा कार्यकारणी जाहीर