नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प येथे प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट उपविभाग अशी दुहेरी जबाबदारी देत महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी नेहा भोसले यांना नियुक्ती दिली आहे.
मुळ मुंबईच्या असलेल्या नेहा भोसले यांनी मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी लखनऊ येथून एमबीएचे शिक्षण पुर्ण केले आणि एका खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी मिळवली. नोकरीत करत त्यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सुध्दा सहभाग घेतला. पण नोकरी करत परिक्षेची तयारी होणार नाही म्हणून त्यांनी 2017 मध्ये खाजगी कंपनीची नोकरी सोडली आणि युपीएससीचा अभ्यास करत दोन वर्ष मेहनत घेतली. पण या दोन वर्षाच्या मेहनतीने त्यांना दुसऱ्या प्रयत्नात 2019 मध्ये यश प्राप्त झाले आणि त्यांनी भारतात 15 वे स्थान मिळवले. आपले प्रशिक्षण पुर्ण करून झाल्यानंतर आता त्यांना एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे प्रकल्प अधिकारी आणि सोबत सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट उपविभाग जिल्हा नांदेड अशी दुहेरी जबाबदारी देवून नियुक्ती करण्यात आली आहे.
किनवट येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी पदावर नेहा भोसले