नांदेड,(प्रतिनिधी) – राज्य सरकारने दिवाळी पूर्वी अनेक आयपीएस आणि मपोसे अधिकारी जे आता पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.त्यांच्या बदल्या केल्या आहेत.पण सोबतच अपर पोलीस अधीक्षक आस्थापना संजीव कुमार सिंघल यांनी काही आदेशात बदल करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यापासून तीन अधिकाऱ्यांना रोखले आहे.त्यात हिंगोली,सिंधदुर्ग आणि यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.राज्य सरकाने काढलेल्या आदेशात अनेक आदेश एकच व्यक्तीचे आहेत.त्यामुळे अनेक पोलीस अधीक्षकांच्या बदल्या अद्याप सार्वजनिक झालेल्या नाहीत.
राज्य सरकारने काल दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी एकूण २५ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.त्यात दोन अधिकारी राज्य सेवेतील आहेत.अनेक पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश एक एक स्वरूपात काढण्यात आले आहेत.त्याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही.उदा.नागपूर ग्रामीण येथे राज्यपालांचे एडीसी शिंगोरी विशाल आनंद यांची नियुक्ती झाली पण येथे असणारे विजय कुमार मगर यांच्या बदलीचे आदेश कालच्या आदेशात नाहीत.तेव्हा असे मगर सारखे अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या एक एक स्वरूपात करण्यात आल्या आहेत.म्हणजे असंख्य अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. पण त्या सार्वजनिक झलेल्या नाहीत.विजय कुमार मगर सुद्धा प्रतीक्षेत आहेत.कालच्या यादीत सुद्धा १९ अधिकारी प्रतीक्षेत आहेत.
कालच २० ऑक्टोबर २०२२ रोजी अपर पोलीस महासंचालक आस्थापना संजीव कुमार सिंघल यांनी एक शासनाच्या बदल्यांचा संदर्भ देऊन काही पोलीस अधीक्षकांच्या बदल्यानं रोखले आहे.त्यात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ हिंगोलीचे समादेशक संदीपसिंघ गिल (नूतन नियुक्ती हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक),सिंधदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे (नवीन नियुक्तीत प्रतीक्षा) आणि यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील (नवीन नियुतीत प्रतीक्षा) यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्यास सांगितले आहे.सिंधदुर्गला औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पवन बनसोड जाणार होते.हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कालसागर प्रतीक्षेत राहणार होते. तसेच पोलीस अधीक्षक महाराष्ट्र राज्य नासिक येथील गौरव सिंह यांना यवतमाळ येथे पाठवण्यात आले होते.
अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी काढलेल्या बदल्यांबाबत निवडणूक आचार संहिता,प्रशासकीय न्यायाधिकरण आणि न्यायालय यांचे आदेश यांचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यास नियंत्रक अधिकाऱ्यांना सांगितले आहे. इतर बदल्या झालेल्या अधिकाऱ्याना त्वरित कार्यमुक्त करावे असे या आदेशात लिहिले आहे.