स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक शाहूवर पुत्रासह गुन्हा दाखल

नांदेड,(प्रतिनिधी)- संपूर्ण पोलीस खाते माझ्या खिश्यात असे सांगत अश्लील शिविगाळ करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उप निरीक्षकाविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उप निरीक्षक जसवंतसिंघ शाहूने आपल्या कडील सरकारी पिस्तुलाचा वापर करून पिस्तुलाच्या मागील बाजूने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
इंदरजितसिंघ चरणसिंघ दफेदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी ते आणि त्यांचे मित्र विजेंद्रसिंघ सिद्धू आणि इंदरजितसिंघ सहोता असे युथ खालसा हॉटेल भगतसिंघ रोड येथे जेवत असतांना तेव्हा स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उप निरीक्षक जसवंतसिंघ शाहू आणि त्यांचा मुलगा जयदीपसिंघ शाहू असे दोघे आले आणि आम्हाला पाहून तुम्ही टॉन्टिंग का करत आहे अशी विचारणा करून तुमच्या सर्व कुटुंबाला आत टाकतो,सर्व पोलीस खाते माझ्या खिश्यात आहे,तुला कोठेही अडकवतो,तुला खपवून टाकतो, असे सांगत आपल्या कडील सरकारी पिस्तूल उलटे पकडून मागील बाजुने तोंडावर मारले.त्यामुळे मला मुक्का मार लागला आहे.जयदीपसिंघने मी पोलिसाला तलवारीने मारले आहे.माझे कोणी काही तर आता काय करणार अशी धमकी दिली असे या एफआयआर मध्ये लिहिले आहे.माझ्या छोट्या भावला सुद्धा जसवंतसिंघ शाहूने त्यांच्या गॅरेजवर जाऊन धमकी दिली होती.जसवंतसिंघ शाहू आणि जयदीपसिंघ शाहू पासून माझ्या परिवारास धोका आहे.
इंदरजितसिंघ चरणसिंघ दफेदार यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी गुन्हा क्रमांक 291/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 294,323,506,34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 नुसार दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.मूत्येपोड हे करणार आहेत.या बाबत परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले.
आजच नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळला आहे.त्यांच्या पदग्रहणाअगोदर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस उप निरीक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस उपनिरिक्षक जसवंतसिंघ शाहु हे ग्रेड पीएसआय आहेत. त्यांना सरकारी पिस्तुल बाळगता येते काय? किंवा त्यांना ते कसे प्राप्त झाले हा सुध्दा एक प्रश्न या गुन्ह्यानंतर समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *