नांदेड,(प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंत्रीनगर रो हाऊस आणि राजसारथीनगर भागात दोन चोऱ्या घडल्या आहेत.त्यात एकूण २ लाख ६५ हजरांचा ऐवज लंपास झाला आहे.
श्याम लक्ष्मणराव नागलगावे रा राजसारथीनगर हे आपल्या कुटुंबासह १८ ऑक्टोबर रोजी बाहेगावी गेले होते.ते २१ ऑक्टोबर रोजी परत आले तेव्हा त्यांच्या घराचा मुख्य दरवाज्याला लावलेले कुलूप तोडलेले होते.घरातील लोखंडी अल्मारीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १५ हजारांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला होता.भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस निरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
संगीता रंगनाथ वाकोडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी ते आणि त्यांचे पती भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेल्याची संधी साधून कोणीतरी चोरट्याने खिडकीतून आय हात घालून पर्स मधील ५० हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने १ लाख रुपयांचे असा एकूण १ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. भाग्यनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या कडे देण्यात आलं आहे.