नांदेड (प्रतिनिधी) – गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 166 बाधित गावात सद्यस्थितीत 1 हजार 982 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 74 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 822 गावांवर विशेष लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार 183 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.
Related Posts
नवभारत साक्षरता सर्वेक्षणानुसार कार्य प्रशिक्षणावर सर्व शिक्षक संघटनेचा बहिष्कार कायम
नांदेड (प्रतिनिधी)-शासन सर्व कामे कंत्राटी पद्धतीने करून घेते तर हे सर्वेक्षणाचे अशैक्षणिक काम शिक्षकांच्या माथी मारण्याचे कारण काय? सर्व शिक्षक…
अक्षय रावत, राजू बिल्डर, अशोक उमरेकरसह कांही जणांवर खंडणीचा गुन्हा
नांदेड(प्रतिनिधी)-नगरसेवक पुत्र अक्षय रावत त्यांचे सहकारी राजू बिल्डर, अशोक उमरेकर, गुड्डू आणि इतर पाच लोकांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी एका 62 वर्षीय…
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही २६/११ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी….हा कार्यक्रम, राज्यातील दिग्गज कलावंतांची उपस्थिती
नांदेड(प्रतिनिधी)- मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी व हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी यावर्षी देखिल पत्रकार विजय जोशी…