नांदेड(प्रतिनिधी)-एका भंगार दुकानातून साहित्य चोरून नेणाऱ्या तिघांविरुध्द मुक्रमाबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुक्रामाबाद येथे सय्यद शादुल बाबूसाब तांबोळी यांचे भंगार दुकान आहे. दि.24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास त्यांचे बंद भंगारचे दुकान तोडून चार जुने अँगल चोरून नेणाऱ्या गणेश शिवाजी रासुरे रा.मुक्रामाबाद, राजू रमेश हेमलवाड रा.कुरळा ता.कंधार निवृत्ती हरी मामडे रा.लोहा जि.नांदेड या चौघांना ज्या चार चाकी गाडी क्रमांक टी.एस.17 टी.8214 सह पडण्यात आले.या अँगलची किंमत 4 हजार रुपये आहे. पोलीसांनी चोरी केलेला मुद्देमाल पुर्णपणे जप्त केलेला आहे.मुक्रामाबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 379, 511 नुसार दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार आडेकर अधिक तपास करीत आहेत.
भंगार दुकानातून चोरी करणारे तिन चोर सापडले