
नांदेड,(प्रतिनिधी)- आपल्या कडून कोणाला आनंद देता आला नाही तरी चालेल.पण आपल्या मुले कोणी नाराज व्हायला नको असे विचारवंत सांगतात. असाच एक सुंदर घटनाक्रम आज सुमन बालगृहात एका महिला पोलीस अंमलदाराने आपला जन्मदिन अनाथ बालिकांसोबत साजरा करून एक आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी महिला पोलीस अंमलदार सौ.मधुवंती सौरते यांचा जन्मदिन आहे.आपण नेहमीच आपल्या माणसांसोबत जन्मदिन साजरा करून आनंद घेत असतो ही प्रथा आहे.पण मधुमती यांनी प्रथे पेक्षा काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले.त्यांचे पती प्रफुल्ल जोंधळे आणि सहकारी पोलीस मित्र सय्यद सत्तार यांनी त्यात त्यांची मदत केली. आज सुमन बालगृहात त्यांनी तेथील बालिकांना काय हवे आहे याची चाचपणी केली. बालिकांना आवश्यक असलेलेगरजेचे साहित्य त्यांनी आपल्या पती सोबत तेथे आणले.आपला छोटा बालक तेजस त्यास पण आपल्यासोबत घेऊन बालसुमनगृह गाठले.तेथे आपल्या जन्मदिनाच्या केकला अनाथ बालिकांसोबत ग्रहण केले.सोबतच आपल्या जन्मदिनी त्या अनाथ बालिकांच्या जीवनात एक आनंदाचा क्षण आणला.महिला पोलीस अंमलदार सौ.मधुवंती सौरते यांनी अश्या प्रकारे आपल्या जीवनातील आनंद अनाथ बालिकांसोबत साजरा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
