नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे बेघर पत्रकारांच्या कॉलनीचा घोटाळा करणाऱ्या महाकथीत मोठ्या पत्रकार या व्याख्येत संजीव कुलकर्णी यांच्या बद्दलचे तीन ऑडीओ संवाद व्हॉटसऍप संकेतस्थळावंर व्हायरल झाले आहे. या संवादात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नांदेड जिल्ह्यातील सर्व राजकीय मंडळी यांची लगामे संजीव कुलकर्णीच्या हातात आहेत असे शब्द आहेत. तसेच त्याने मागे आखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या निवडणुकीचा उल्लेख सुध्दा या ऑडीओमध्ये आहे. ज्यात कशा पध्दतीने पत्रकार संघटनेच्या मत पत्रीका पळवून स्वत:च शिक्के मारल्याची शब्द रचना या ऑडीओमध्ये आहे. त्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पत्रकारीतेचे महामेरु सुधाकररावजी डोईफोडे यांना सुध्दा मतदान करता आले नव्हते असे म्हटले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे काका अनिकेत कुलकर्णी आता कामातून गेल्याचा उल्लेख या संवादात आहे. विशेष म्हणजे कधी काळी संजीव कुलकर्णीच्या पदराला धरुन फिरणाऱ्या महान व्यक्तीने हे ऑडीओ क्लिप व्हायरल करणाऱ्याचे नाव सुध्दा त्या ग्रुपवर सेना प्रविण जेठेवाड असे आहे. सोबत नांदेडचे महागुंड पत्रकार खंडग्रास, सुर्यग्रहण, दाढी संजीव कुलकर्णीच्या महान भ्रष्ट पत्रकारीता बद्दलची चर्चा, मॅनेज पत्रकारीता बद्दलचे तीन ऑडीओ व्हायरल असे शब्द सुध्दा या महान व्यक्तीने बेघर पत्रकारासाठी लिहिले आहेत.कधीकाळी यांनीच संजीव कुलकर्णीला कोट्यावधीच्या व्यवसायात भागिदार बनवले होते.
आज सकाळी 10.52 वाजता तीन संवाद ऑडीओ व्हायरल झाले.या ऑडीओमध्ये दोन व्यक्ती बोलत आहेत. एक सांगतो नांदेड जिल्ह्यात एकमेव पत्रकार आहे संजीव कुलकर्णी माझा गुरू आहे तो. काही दिवसांअगोदर संदीप काळे नावाचा मागे लईच करू लागला होता असे दुसरा म्हणतो. तेंव्हा पहिला म्हणतो की, हे सर्व त्याच्याकडूनच आले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाला कोठे ठेवायचे हे संजीव कुलकर्णी ठरवतो. नांदेडच राजकारण चालवल त्याने. तेंव्हा पहिला विचारतो कोणता तो तेंव्हा दुसरा म्हणतो की, दाढी, मोठ-मोठ तोंड थोड-थोड साहेबांसारख आहे. मिनिस्टर लेव्हल पर्यंत संबंध आहेत, राज्यचे असतील किंवा केंद्राचे असतील. माझा काही संबंध आहे की, नाही मी नावानीशी ओळखतो आणि ते सुध्दा ओळखतात. शिवसेनेला खड्ड्यात टाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस सोबत त्याचे जुने संबंध आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे वडील कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या बद्दल सुध्दा या संवादात दोन-तीन वाक्य आहेत पण आम्ही ते लिहुन पत्रकारीतेला काळीमा फासू इच्छीत नाही. या वाक्यात एक वाक्य असेही आहे की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजही त्याच्याच अर्थात संजीव कुलकर्णीच्या ओंजळीने पाणी पितात.
संबंधीत रेकॉर्डींग….
त्याला कमईच काय, पत्रकारीतेचा फायदा उचलून अभंग पुस्तकालय बनवले. त्यातून महिन्याला 70 ते 80 हजार रुपयांची कमाई होते. जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक त्याच्या घरी पाणी भरतात. संस्थांच्या वाचनालयामध्ये कोणीती आणि किती पुस्तके पाठवायची हे तो ठरवतो. अशा प्रकारे या महान बेघर पत्रकाराच्या चर्चा या ऑडीओ क्लिपमध्ये उपलब्ध आहेत.
दीड दशकापुर्वी हा संजीव कुलकर्णी मुंबईतील आखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष होता आणि नंतर सरचिटणीस झाला. त्या निवडणुकीबद्दल सुध्दा या ऑडीओ क्लिपमध्ये चर्चा आहे. या चर्चेत एक सांगत आहे पुर्णेचा एक वार्ताहर होता कलीम आणि त्याचा भाऊ होता रेल्वेच्या पोस्ट खात्यात.नांदेड जिल्ह्यासाठी पत्रकार परिषदेच्या निवडणुकीसाठी आलेल्या सर्व मतदान पत्रिका आम्ही पोत्यात भरून आणल्या आणि स्वत:च शिक्के मारुन परत पाठवल्या. त्यावेळी नांदेडचे पत्रकारीतेतील महामेरु कै.सुधाकररावजी डोईफोडे यांना सुध्दा मतदान करता आले नाही असा लई मोठा माणुस आहे हा संजीव कुलकर्णी. अनिकेत कुलकर्णी बद्दल एक वाक्य या ऑडीओमध्ये आहे ज्यात संजीव कुलकर्णीचा पिट्टू सांगत आहे की, अनिकेत कुलकर्णी गेले आता.
अशा या महान हाडाच्या पत्रकाराबद्दल ऐकलेले शब्द घाणेरडे वाटत आहेत. त्यांनी आपल्या जीवनात किती लोकांना, कशा पध्दतीने भ्रमित करून आपला डाव साधला हे दिसते आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा 70 वर्षापुर्वीचा पत्रकार साआदत हसन मंटो यांची आठवण होते ते सांगत होते की, कोठे की, तवायफ और एक बिका हुवा पत्रकार एक ही श्रेणीमें आते है लेकीन इसमें तवायफ की इज्जत ज्यादा होती है। या संवादात काका अनिकेत कुलकर्णी बद्दल सुध्दा अनिकेत कुलकर्णी गेला आता असे शब्द आहेत पण अनिकेत कुलकर्णी त्या दाढी बद्दल सांगतात की, “पत्रकारीतेतून कमावण्याचा बांधला मी चंग आहे वृत्तपत्र असो वा पुस्तक पैशांशी नाते अभंग आहे’ या एका चारोळी सोबत काकाने या बेघर पत्रकारासाठी दुसरी चारोळी पण तयार केली आहे ती अशी की, “पुण्य संपलेला पुढारी पत्रकार आता एकच काम करतो, शिवाजीनगरमधून माल घेतो आणि तांड्यात जावून माल मारतो’ या अशा महान पत्रकाराबद्दल लिहितांना थोडी ग्लानी होत आहे पण सत्य मांडण्याची शपथ घेवूनच पत्रकारीता सुरू केलेली आहे त्यात आम्हाला कितीही त्रास झाला तरी आम्ही सत्याची बाजू कधीच सोडणार नाहीत.
संबंधीत रेकॉर्डींग….