नांदेड(प्रतिनिधी)-बनावट पोलीस निरिक्षक असल्याचे सांगून हदगावच्या बसस्थानकात एका 78 वर्षीय व्यक्तीची दोन भामट्यांनी फसवणूक करून 60 हजार रुपयांचा ऐवज घेवून गेले आहेत.
दादाराव विश्र्वनाथराव देवसरकर (78) रा.लिंगापूर ता.हदगाव हे नांदेड येथून प्रवास करून हदगाव बसस्थानकात उतरले. त्या ठिकाणी दोन जण त्यांच्या जवळ आले आणि आम्ही पोलीस निरिक्षक आहोत असे सांगून त्यांना वेगवेगळ्या शब्दांतून अनंत बाबी सांगितल्या. त्यांच्या बॅगमधील 10 हजार रुपये रोख रक्कम आणि त्यांच्या बोटातील 5 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या 50 हजार रुपये किंमतीच्या असा 60 हजार रुपयांचा ऐवज त्यांची फसवणूक करून ते दोन तोतय्या पोलीस निरिक्षक निघून गेले.हदगाव पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक पांढरे अधिक तपास करीत आहेत.
दोन तोतय्या पोलीस निरिक्षकांनी 78 वर्षीय माणसाची हदगावच्या बसस्थानकात फसवणूक केली