राज कॉर्नरजवळचा घरगुती गॅस पंप जोरदारपणे सुरूच; प्रशासनाचे का दुर्लक्ष ?

नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील राज कॉर्नर जवळ महिला वस्तीगृहाच्या लगत सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलेंडरचा पंप आजही बेकायदेशीररित्या तो घरगुती गॅस वाहनांमध्ये भरण्याचा धंदा जोरातच चालवत आहेत. त्यावर पुरवठा विभाग, पोलीस कोणीच नियंत्रण आणू शकत नाही.
राज कॉर्नरजवळ एका अंडरग्राऊंड शटरमध्ये एक लोखंडी खिडकी तयार करण्यात आली. या खिडकीच्या आतमध्ये घरगुती गॅस सिलेंडर ठेवण्यात आलेले आहेत. मुळात या दुकानाला शटर आहे. परंतू शटर उघडे ठेवून हा बेकायदा धंदा केला तर तो बेकायदा गॅस पंप सर्वांच्या दृष्टीपथात येईल. म्हणून शटर बंद ठेवून तेथे एक खिडकी तयार करण्यात आली. त्याला लोखंडी दार लावण्यात आले आहे. कोणतेही वाहन त्या ठिकाणी गॅस भरण्यासाठी आले तर लगेच त्या खिडकीतून गॅस भरणारा पाईप बाहेर येतो आणि त्या पाईपच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलेंडरमधला गॅस पध्दतशिरपणे वाहनात भरला जातो. हा व्यवसाय दिवसरात्र सुरूच आहे. पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
गॅस सिलेंडवर नियंत्रण करण्याचे मुळ काम महसुल विभागातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे आहे. पण सर्वच प्रकारच्या अवैध आणि बेकायदा बाबींवर नियंत्रण करण्याची जबाबदारी पोलीस विभागाची पण आहे. पुरवठा विभाग यावर लक्ष केंद्रीत करत नसेल तर मग पोलीस सुध्दा या बेकायदेशीर घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये करणाऱ्या पंपाकडे का दुर्लक्ष करत आहेत याचा शोध नुतन पोलीस अधिक्षकांनी घ्यायला हवा अशी चर्चा होत आहे.
संबंधीत बातमी…..

https://vastavnewslive.com/2022/10/17/घरगुती-गॅस-वाहनात-भरण्या/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *