नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे सरकार केंद्राच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला बरबाद करत आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातून अनेक मोठे उद्योग गुजरात राज्यात पाठवले जात आहेत. राज्य सरकारला बरखास्त केले नाही तर कॉंगे्रस पक्ष याविरुध्द मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी दिली.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियान यात्रा कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी ते नांदेडला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राज्य शासनाने गुजरातला जाण्यासाठी मदत करून ते राज्याला बरबादीकडे नेत आहेत या संदर्भाने आम्ही सोमवारी निवेदन देणार असून त्याद्वारे महाराष्ट्र सरकारला बरखास्त करण्याची मागणी करणार आहोत. नसता आम्ही कॉंगे्रस पक्षाच्यावतीने या घटनेविरुध्द मोठे आंदोलन उभारू असे नाना पटोळे सांगत होते.
महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या इशाऱ्यांवर राज्याला बरबाद करत आहे-नाना पटोळे