स्वारातीम सिनेट निवडणुक ताकतीने लढणार-वरुण सरदेसाई

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची सिनेट निवडणुक युवा सेनेच्यावतीने ताकतीने लढवली जाणार असल्याची माहिती युवा सेना नेते वरुण सरदेसाई यांनी पत्रकारांना दिली.
आज नांदेड-हिंगोली-लातूर आणि परभणी जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नांदेडमध्ये झाली आणि त्या माध्यमातून स्वारातीमच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम ठरविण्यात आला. या निवडणुकीत आम्ही पुर्ण ताकतीने लढणार असून आमच्या पॅनलची नावे युवा सेना नेते आदित्य ठाकरे दोन दिवसात जाहीर करतील असे सरदेसाई म्हणाले.
राज्यातून दोन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आम्ही युवा सेनेच्यावतीने उद्योग मंत्र्यांना निवेदन दिले होते की, गेले ते गेले उर्वरीत मोठे प्रकल्प स्थिर ठेवा. त्यात नागपुर येथील एअर बस प्रकल्प महत्वाचा आहे. त्यासाठी नियोजन करा पण आता तो एअर बस प्रकल्प पण गुजरातला गेला आहे. ही बाब अत्यंत दु:ख दायी असल्याचे सरदेसाई म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *