नांदेड(प्रतिनिधी)-एक 25 वर्षीय युवक बेपत्ता/हरवला असल्यासंदर्भाची खबर एका वडीलांनी दिल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणाची मिसींग सदरात नोंद केली आहे. वजिराबाद पोलीसांनी याबद्दल शोध पत्रीका जारी केली असून जनतेला आवाहन केले आहे की, हा बेपत्ता युवक कोणास दिसला तर त्याबद्दलची माहिती वजिराबाद पोलीस ठाण्यात द्यावी.
गंगाधर गणपत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा अविनाश गंगाधर जाधव (25) रा.हमालपुरा नांदेड हा 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता मला हिंगोली गेट जवळ भेटला आणि माझ्या नोकरीवर मॅक्स मेन्स वेअर महाविर चौक येथे जात आहे म्हणाला. पण तो परत आला नाही. म्हणून गंगाधर जाधव यांनी 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी याबाबतची खबर दिली. वजिराबाद पोलीसांनी या बाबत मिसिंग क्रमांक 24/2022 दाखल केली आहे. या मिसिंगचा तपास पोलीस अंमलदार डी.एस.केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार डी.एस.केंद्रे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, बेपत्ता/ हरवलेल्या युवकाचे नाव अविनाश गंगाधर जाधव आहे. त्याचे वय 25 वर्ष आहे. रंग गोरा आहे. चेहरा गोल आहे. उंची 5 फुट 5 इंच आहे. बांधा मजबुत आहे. त्याने घरुन जातांना पांढरा शर्ट आणि जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याचे केस काळे आणि लांब आहेत. नाक सरळ आहे. त्याला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. या युवकाला कोणी पाहिल्यास त्यांनी वजिराबाद पोलीस ठाणे येथील दुरध्वनी क्रमांक 02462-236500 वर किंवा माझ्याशी थेट मोबाईल क्रमांक 9970381047 वर संपर्क साधून माहिती द्यावी.
25 वर्षीय युवक हरवला आहे; वजिराबाद पोलीसांनी जारी केली शोध पत्रिका