नांदेड(प्रतिनिधी)-तिन दिवसांपुर्वी जिवे मारण्याची धमकी देवून तिसऱ्या दिवशी धार-धार हत्याराने 28 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या पाच जणांना बिलोली न्यायालयाने 1 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
26 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास बालाजी ढगे, कृष्णा ढगे, बंटी ढगे, गणेश ढगे, सचिन खंडेगावे या पाच जणांनी मन्मथ इरवंत धोंडापूरे (28) याच्या चेहऱ्यावर, डोक्यावर काही तरी धार-धार शस्त्राने वार केले. तो मेल्यानंतर त्याचे प्रेत बाळासाहेब चव्हाण यांच्या शेतात नेऊन फेकून दिले. याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवणे, खून करणे, पुरावा नष्ट करणे आदी सदरांखाली गुन्हा क्रमांक 119/2022 दाखल करण्यात आला.
खून करून हे पाच आरोपी रेल्वेने पळून जात असतांना त्यांचा माग काढून नांदेड पोलीसांनी मनमाड पोलीसांच्या सहाय्याने त्यांना रस्त्यात जेरबंद केले. दि.29 ऑक्टोबर रोजी या पाच जणांना कुंडलवाडी पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली. आज 30 ऑक्टोबर रोजी कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्र्वास कासले आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी पकडलेल्या पाच जणांना न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. ती मागणी न्यायालयाने 1 नोव्हेंबर पर्यंत मंजुर केली आहे.
चिरली ता.बिलोली येथे खून करणाऱ्या पाच जणांना पोलीस कोठडी