नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 39 हजार 340 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर शहरात एक वकील महिलेचा घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. नाईकनगर नांदेड येथील एक घरफोडून चोरट्यांनी 40 हजारांचा ऐवज चोरला आहे. या तिन्ही घरातील मंडळी दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेली होती. भोकर शहरातून चार जनावरे चोरीला गेली आहेत. त्यांची किंमत 65 हजार रुपये आहे. उमरी तालुक्यातील शेलगाव येथून काढून ठेवलेल्या सोयाबीनपैकी दोन क्विंटल सोयाबीन 10 हजार रुपये किंमतीचे चोरीला गेले आहे.
विलास धोंडीबा महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हदगाव येथील तामसा रोड परिसरात त्यांचे घर आहे. ते आणि त्यांचे कुटूंबिय दिवाळी सणासाठी सासरवाडीला गेले होते. त्या दरम्यान 27 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजता कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दगिणे, होमथेटर, साखर आणि गोडतेल असे साहित्य 39 हजार 340 रुपये किंमतीचे चोरून नेले आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक पांढरे अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील ऍड. वनिता रामराव राठोड या 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान बाहेरगाव गेल्या असतांना चोरट्यांनी त्यांचे घरफोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे असा एकूण 1 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
शहरातील नाईकनगर भागात 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान गोविंद हुसेन्ना दुबेवाड यांचे घर फोडून चोरट्यांनी 2 लॅपटॉप संगणक 40 हजार रुपये किंमतीचे चोरुन नेले आहेत.विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कुरळेकर अधिक तपास करीत आहेत.
भोकर शहरातील बिलालनगर आणि गांधीनगर अशा दोन भागातून 27 फेबु्रवारी 2022 रोजी रात्री 1.30 वाजता चार जनावरे ज्यात दोन गाई, एक गोरा आणि एक कारवड ज्यांची किंमत 65 हजार रुपये आहे. चोरुन नेले आहेत. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार लक्षटवार अधिक तपास करीत आहेत
तानाजी नागोराव कदम यांनी 25 ऑक्टोबर रोजी आपल्या शेतातील काढलेले 9 पोते सोयाबीन शेलगाव येथील मधुकर पांचाळ यांच्या दुकानासमोर ठेवले होते. 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत त्या 9 पोत्यांमधील 4 पोते, अर्थात 2 क्विंटल सोयाबीन दहा हजार रुपये किंमतीचे चोरीला गेले आहे. उमरी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सरोदे अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथे महिला वकीलाचे घरफोडले; साखर, गोडतेल, सोयाबीन चोरले