बिलोली(प्रतिनिधी)-तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी असलेल्या चार आरोग्य सेविकांची सेवा समाप्तीचे अधिकृत पत्र बिलोलीच्या तालुका आरोग्य केंद्रात प्राप्त झाले आहे.यात प्राथमिक आरोग्य केंद्र सगरोळी अंतर्गत एक तर लोहगाव केंद्रा अंतर्गत तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दि.31 आक्टोबर रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका (एनएचएम) बिलोली तालुक्यातील चार सेविकांचे सेवा समाप्तीचे आदेश तालुका आरोग्य कार्यालयात धडकले असून यांच्यावर ठरवून दिलेल्या ठिकाणी प्रसुतीची कामे समाधान कारक नसल्याचा ठपका असून आज पर्यंत शुन्य काम असल्याचेही सांगण्यात आले.सदर सेविका यांना ठरवून देण्यात आलेले काम न करणे हे महागात पडल्याचे दिसून येत आहे.कांही कालावधीत या सेविका शासनाच्या सेवेत कायम स्वरुपी होणार होत्या अशी माहीती मिळाली.सेवा समाप्तीमध्ये सगरोळी आरोग्य केंद्रातील कार्ला(बु.)उपकेंद्राच्या वैशाली माधव कांबळे, लोहगाव केंद्रा अंतर्गत कासराळी उपकेंद्राच्या मोकळीकर अनुराधा दिगंबर,बेळकोणीच्या मोरे पार्वती लालुदास व गागलेगावच्या सविता मोहनराव वानोळे यांचा समावेश आहे.एक कठोर अधिकारी म्हणून नाव लौकिक असलेले तुकाराम मुंडे यांनी राज्याच्या आरोग्य आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यापासून कांही अंशी का होईना कामचुकार अधिकारी कर्मचारी हे धास्तावलेले असल्याचे दिसून येत आहे.

