महिला ग्रामसेविकेसोबत जातीय द्वेष करणाऱ्या 26 हंबर्डेवर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल

हंबर्डेने हंबर्डेचे रेकॉर्डींग ग्रामसेवक महिलेला दिले
नांदेड(प्रतिनिधी)-एका हंबर्डेने दुसऱ्या हंबर्डेशी बोललेले कॉल रेकॉर्डींग अनुसूचित जातीच्या महिला ग्रामसेवकाला दिल्यानंतर त्यात ग्रामसेविकेबद्दल वापरलेल्या जातीवाचक शब्दांच्या परिणामात 26 जणांविरुध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी) कायदासह भारतीय दंड संहितेची कलमे असा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.


नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील ग्रामसेविका यांनी 1 नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मागील आठ महिन्यापासून त्यांना ग्रामसभेबद्दल त्रास दिला जात होता. एकाही ग्राम सभेला हजर न राहिलेल्या उपसरपंच सदानंद गोविंदराव कुरे यांनी उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षरी केलेली नाही. तसेच ग्राम पंचायत सदस्या द्रोपदाबाई अण्णाराव हंबर्डे या 19 फेबु्रवारी 2021 च्या ग्रामसभेची सुचना देऊन सुध्दा हजर राहिल्या नाहीत. 20 सप्टेंबर 2021 रोजी सरपंच लक्ष्मीबाई बबनराव हंबर्डे यांना पत्र देऊन अनुउपस्थिती असलेल्या उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांबद्दल वरिष्ठांना अहवाल सादर करायचा आहे असे सांगितले. पण 15 ऑक्टोबर 2021 रोजी सरपंच लक्ष्मीबाई हंबर्डे यांनी ग्रामसेविका यांना पत्र दिले की, अनुउपस्थिती उपसरपंच आणि सदस्य यांच्या अनुउपस्थितीचा विषय तुर्त मासिक सभेत घेण्यात येवू नये.
यानंतर उपसरपंच सदानंद गोविंदराव कुरे आणि सदस्य द्रोपदाबाई अण्णाराव हंबर्डे यांची मुले शामराव अण्णाराव हंबर्डे व भिमराव अण्णाराव हंबर्डे यांनी मी अनुउपस्थितीचे पत्र का काढले याचा राग मनात धरुन 13 ऑगस्ट 2022 रोजी मी ग्राम पंचायत कार्यालयात उपस्थित असतांना लक्ष्मीबाई हंबर्डे, त्यांचे पती बबनराव हंबर्डे हे सुध्दा ग्राम पंचायत कार्यालयात असतांना ग्राम पंचायत कार्यालयासमोर मंदिराबाहेर उपसरपंच सदानंद गोविंदराव कुरे, शामराव अण्णाराव हंबर्डे, भिमराव अण्णाराव हंबर्डे आदींनी मला पाहुन माझ्या जातीविषयी घाण शब्द वापरुन माझा उल्लेख केला. त्यावेळी संदीप सुरेश हंबर्डे, कैलाश ग्यानोबा हंबर्डे, शिवाजी विठ्ठलराव हंबर्डे, माधव जगदेवराव हंबर्डे, तिरुपती गोविंदराव कुरे, दत्ता रामराव हंबर्डे, सतिश नागोराव हंबर्डे, समाधान विनायकराव हंबर्डे, विष्णु नागोराव हंबर्डे, शिवहर नामदेव हंबर्डे, सुनिल मधुकर हंबर्डे, देवराव जेजेराव हंबर्डे, गजानन माधवराव हंबर्डे, अवधुत रामराव हंबर्डे, गजानन विनायक हंबर्डे, श्रीकांत प्रकाशराव हंबर्डे, कृष्णा वसंतराव हंबर्डे, माधव प्रल्हाद हंबर्डे, जगदेवराव माधवराव हंबर्डे, गजानन प्रतापराव हंबर्डे, मारोती आबाराव हंबर्डे, आकाश ज्ञानोबा हंबर्डे, शिवानंद गोविंदराव कुरे तसेच उपसरपंच शामराव अण्णाराव हंबर्डे यांनी माझा सार्वजनिक ठिकाणी अपमान केला.
यापुढे 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वजाला वंदन करून पुन्हा एकदा काही लोक येवून मला जोरजोरात बोलत होते आणि ग्रामसभा घ्या. आताच तंटामुक्ती अध्यक्ष निवडा, सर्व ग्रामपंचायतचा अभिलेख आताच्या आता दाखवा असे मला म्हणाले. त्यावेळी मी आताच्या आता सर्व कांही दाखवता येणार नाही नियमाप्रमाणे ग्रामसभा घेण्यात येईल. त्यावेळी मला कोंडून टाकून असे म्हणत भिमराव अण्णाराव हंबर्डे याने बाहेर जावून दार बंद करून कोंडी लावली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. असाच प्रकार पुढे 19 ऑक्टोबर 2022 रोजी घडला. ग्रामपंचायतच्या सरपंचाचे पती बबनराव बाजीराव हंबर्डे हे आणि मी ग्रामपंचायत कामासाठी पंचायत समिती नांदेड येथे असतांना शामराव अण्णाराव हंबर्डे यांच्या फोनवरून बबनराव बाजीराव हंबर्डे यांना फोन आला आणि त्या संवादात पुन्हा माझ्या जातीविषयक शब्द वापरून माझा अपमान करण्यात आला. हे सदरचे फोन रेकॉर्डींग मला बबनराव बाजीराव हंबर्डे यांनी दिले आहेत. म्हणून उपसरपंच सदानंद गोविंदराव कुरे, शामराव अण्णाराव हंबर्डे, भिमराव अण्णाराव हंबर्डे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला जातीय द्वेष भावनेतून त्रास दिला आहे तरी त्यांच्या योग्य कायदेशीर कार्यवाही व्हावी असे उल्लेख ग्रामसेविकेंनी आपल्या अर्जात केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी काल दि.1 नोव्हेंबरच्या रात्री या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 650/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 442, 34 आणि ऍट्रॉसिटी कायदाच्या कलम 3(1)(एल), 3(1)(एम), 3(1)(आर) आणि 3(1)(एस) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याकडे या ग्रामसेविकेंनी बऱ्याच दिवसापुर्वीपासून हा अर्ज दिला होता अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पण गुन्हा दाखल झाला नाही. काल 1 नोव्हेंबर 2022 रोजी या संदर्भाने मी आजच तक्रार दिली असा उल्लेख करून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा ऍट्रॉसिटी कायदाचा गुन्हा अखेर दाखल तर केला आहे. अशाच पध्दतीचा एक अर्ज पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे 15 ऑक्टोबर 2022 पासून दिलेला आहे. आजपर्यंत शिवाजीनगर पोलीसांनी यात गुन्हा दाखल करणे तर सोडाच पण पुन्हा या तक्रारदाराला बोलावून त्याच्याकडून माहिती सुध्दा घेतलेली नाही.
पोलीस दलात ही मोठीच समस्या आहे. सवर्ण अधिकारी असेल तर तो सवर्णांवर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल न करता कसा वाचवता येईल यासाठी प्रयत्न करतो. अनुसूचित जाती जमातीचा अधिकारी असेल तर तो तक्रारदाराला मी तुझाच आहे, तु माझाच आहे असे सांगून त्या गुन्ह्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. या ऍट्रॉसिटी कायदाचा खोटा वापर करणाऱ्यांची चलती असते. त्यातही काही कर्तव्यदक्ष अधिकारी खोटेपणाला ओळखतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवतात. पण गुन्हा दाखल न होणे, गुन्हा वाचविण्याचा प्रयत्न करणे या दोन्ही प्रकारांमध्ये पुन्हा एकदा अन्याय अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवरच होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *