तीन जबरी चोऱ्या, दोन घरफोड्या, दोन दुचाकी चोरी; 3 लाख 85 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात तीन जबरी चोऱ्या घडल्या आहेत. जिल्ह्यात दोन घरफोड्या झाल्या आहेत. तसेच दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या सर्व प्रकारांमध्ये मिळून 3 लाख 85 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला आहे.
सुचिता प्रविण मामीडवार या महिला 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्यासुमारास मगनपुरा येथील बालाजी मंदिरात दर्शनासाठी आल्या असतांना एका दुचाकीवर दोन जण आले आणि अत्यंत जोरदारपणे त्यांच्या बाजूने पुढे निघून गेले आणि काही क्षणातच दुसऱ्या गल्लीतून त्यांच्या समोर आले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि मनी असा 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 34 नुसार दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक माने अधिक तपास करीत आहेत.
शोभा लक्ष्मीकांत सुत्रावे या महिला 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता पुजा-अर्चाकरण्यासाठी तुळशी आणण्यासाठी पायी जात असतांना डॉ.देशपांडे रा.काबरानगर यांच्या घरासमोर दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यंाच्या गळ्यातील चैन तोडून पळत असतांना शोभा सुत्रावे यांनी ती चैन पकडली तेंव्हा ती अर्धी तुटली. तुटलेली अर्धी दोन तोळे सोन्याची चैन 75 हजार रुपयांची त्या चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक देशमुख हे करीत आहेत.
नरेश द्वारकादास तापडीया हे 1 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजता आपल्या वडीलांना सोबत घेवून दुचाकीवर बसून घराकडे जात असतांना पिरबुऱ्हाणनगर येथे दोन चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून झटापट करून त्यांच्या हातातील 25 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग बळजबरी चोरून नेली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या प्रकारानुसार चोरटे बऱ्याच वेळापासून या दोघांची वाट पाहत होते असे स्पष्टपणे दिसते. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते अधिक तपास करीत आहेत.
संबंधीत सीसीटीव्ही….

 

संदीप केरबा सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान त्यांच्या शेतातील घर बंद होते. याचा फायदा घेवून चोरट्यांनी 17 हजार रुपये किंमतीची एक बॅटरी त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली आहे. मनाठा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिरी अधिक तपास करीत आहेत.
संघरत्न संग्राम ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास फुलेनग देगलूर येथील त्यांच्या घराच्या मागील दरवाज्याचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे 43 ग्रॅम वजनाचे, 1 लाख 8 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.
या शिवाय पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण आणि पोलीस ठाणे भाग्यनगर यांच्या हद्दीतून दोन दुचाकी, 40 हजार रुपये किंमतीच्या कोणी तरी चोरट्यांनी चोरल्या आहेत. याबाबत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *