नांदेडचे नूतन अपर जिलाधिकारी पांडुरंग कांबळे;खुशालसिंह परदेशी हिंगोली ६ अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या;१९ उप जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती

निवासी उप जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी नागपूरला 

नांदेड,(प्रतिनिधी)-राज्य शासनाने ६ अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.त्यात नांदेडचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना हिंगोलीचे अपर जिल्हाधिकारी पद देण्यात आले आहे.नांदेड येथे पांडुरंग शंकरराव कांबळे यांना पाठवण्यात आले आहे. तसेच १९ निवडश्रेणीतील उप जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत.त्यात नांदेडचे निवासी उप जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे उपायुक्त पुनर्वसन या पदावर पाठवण्यात आले आहे.महसूल व वन विभागाचे उप सचिव डॉ.डॉ.माधव वीर यांची या आदेशांवर डिजिटल स्वाक्षरी आहे.

राज्य शासनाने ६ अपर जिलाधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.त्याचे सध्याचे ठिकाण आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण पुढे कंसात लिहिले आहे. खुशालसिंह परदेशी- अपर जिलाधिकारी नांदेड (अपर जिल्हाधिकारी हिंगोली),दिलीप गुट्टे- अपर जिल्हाधिकारी पालघर (उपायुक्त रोहयो अमरावती विभाग), घनश्याम भुगांवकर – अपर जिल्हाधिकारी भंडारा (उपायुक्त गोसी खुर्द नागपूर), धंनजय निकम – अपर जिल्हाधिकारी नोंदणी मुद्रांक मुंबई (अपर जिल्हाधिकारी गाऱ्हाणी निराकरण प्राधिकरण नंदुरबार), जीवन दत्तात्रय गलांडे – नियुक्तीच्या प्रतीक्षेत (अपर जिल्हाधिकारी सातारा), आशा पठाण – उपायुक्त गोसी खुर्द प्रकल्प नागपूर (अपर जिल्हाधिकारी नागपूर)

सोबतच राज्य सरकारने १९ निवडश्रेणीतील उप जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन नवीन पदस्थापना दिल्या आहेत.त्यांची नावे आणि नवीन पदस्थापना पुढील प्रमाणे आहेत. प्रज्ञा त्रिंबक बडे-मिसाळ – नासिक विभागीय आयुक्त कार्यालयात रोजगार हमी विभाग,प्रदीप प्रभाकर कुलकर्णी – उपायुक्त पुर्नवसन विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, डॉ.प्रताप सुग्रीव काळे – अपर जिल्हाधिकारी परभणी, सुहास शंकरराव मापारी- अपर जिल्हाधिकारी अहमदनगर, मंदार श्रीकांत वैदय- उपायुक्त करमणूक कर विभागीय आयुक्त कार्यालय कोकण,पाडुरंग शंकरराव कांबळे – अपर जिलाधिकारी नांदेड,नरेंद्र सदाशिवराव फुलझेले – अपर जिल्हाधिकारी वर्धा,रीता प्रभाकर मेत्रेवार- उपायुक्त पुर्नवसन विभागीय आयुक्त कार्यालय कोकण,शिवाजी तुकाराम शिंदे- अपर जिलाधिकारी उस्मानाबाद,सुनील विठ्ठलराव यादव – अपर जिलाधिकारी अंबेजोगाई,सुनील वसंतराव विचनकर- अपर जिल्हाधिकारी भंडारा,विजय बिंदू माधव जोशी-अपर जिल्हाधिकारी अकोला, श्रीकांत वसंत देशपांडे – अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर,दादाराव सहदेवराव दातकर – वन जमावबंदी अधिकारी कोकण ,अजित पंडितराव साखरे – उपायुक्त रोहयो विभागीय आयुक्त कार्यालय कोकण,अनिल रामकृष्ण खंडागळे- अपर जिलाधिकारी गडचिरोली,उत्तम राजाराम पाटील-अपर जिल्हाधिकारी बीड,मनोज शंकरराव गोहाड – अपर जिलाधिकारी मुंबई उपनगर,बाबासाहेब रावजी पारधे- अपर जिलाधिकारी नासिक तसेच मंजुषा मिसकर आणि तुषार ठोंबरे यांचे स्वतंत्र आदेश निघणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *