नांदेड,(प्रतिनिधी)- आज एकादशीच्या दिवशीची पहाट होण्याअगोदर चोरटयांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दुकाने फोडलायची घटना समोर अली आहे. पोलिसांनी स्वान पथक आणि ठसे तज्ञ बोलावले आहेत. चोरट्यानी इतवारा हद्दीतील काही दुकानाच्या चाब्या वजिराबाद पोलिसांच्या हद्दीत आणून फेकल्या आहेत.
आज कार्तिक शुद्ध एकादशीची पहाट होण्या अगोदर चोरट्यांच्या एका गटाने सलग पाच दुकाने फोडल्याची घटना सूर्योदयासोबतच उघडकीस आली. लोहार गल्ली भागातील साईनाथ मेडिकल,जुना मोंढा भागातील नोमुलवार मेडिकल,एच.रहीम अँड कंपनी,त्यांच्या शेजारील जयगोपाल कृष्णकुमार ट्रेडिंग कंपनी आणि वजिराबाद भागातील ख़ुशी ज्वेलर्स अशी पाच दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.
इतवारा आणि वजिराबाद पोलिसांचे काही अधिकारी आणि बरेच पोलीस अंमलदार फोडलेल्या दुकानांकडे आलेले आहेत.लगेच पोलिसांनी स्वान पथक आणि ठसे तज्ञ यांना बोलावले आहे.स्वान पथकाचा माग मार्ग समजला नाही.ठसे अहवाल येण्यास उशीर लागेल.काही दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोन चोरच आहेत. ज्यांनी हि कार्यवाही केली आहे.ते दुचाकीवर फिरून हे कृत्य करत होते.प्राप्त माहितीनुसार इतवारा हद्दीत चोरी केलेल्या काही दुकानांमधील चाब्या चोरटयांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळिजी टेकडी भागात फेकलेल्या सापडल्या आहेत.फोडलेल्या पाच दुकानांमधून काय काय चोरीला गेले याची सविस्तर माहिती वृत्त लिहीपर्यंत मिळाली नाही.कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.

