नांदेड(प्रतिनिधी)-दारु बंदीचा दिवस अर्थात कोरडा दिवस असतांना दारु विक्री करणाऱ्या चार जणांविरुध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या चार गुन्ह्यांमध्ये एकूण 17 आरोपी करण्यात आले आहेत. या सर्वांकडून 1 लाख 63 हजार रुपये दंड न्यायालयाने ठोठावल्यानंतर वसुल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेडचे अधिक्षक अ.अ.कानडे यांनी पाठवलेल्या प्रसेनोटनुसार 4 नोव्हेंबर रोजी कातिर्की एकादशी होती. या दिवशी राज्य सरकारने दारु बाबत कोरडा दिवस जाहीर केलेला होता. या दिवशी रात्री हॉटेल सरदारजी भगतसिंघ रोड नांदेड, सोनु ढाबा भगतसिंघ रोड नांदेड, सन्नी ढाबा भगतसिंघ रोड नांदेड, राजवाडा ढाबा नमस्कार चौक या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकले. या सर्व चार छाप्यांमध्ये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये रविंद्रसिंघ भगवानसिंघ फिरंगे, दारु पिणारे रविकांत नामदेव चावरे, संदीप सुभाष चव्हाण, सुरज सुभाष मचल, गजानन रघुनाथ वाळंजकर, महेश जनार्दन महामुने आणि रविसिंघ बाबा राठोड, योगेंद्रसिंघ राजेंद्रसिंघ गाडीवाले, अनिरुध्द पंजाब कदम, महेश सुर्यकांत कस्तुरकर, शशांक भगवानराव मेढ, गणेश सतिश बिडवई, सुखविंदरसिंघ खेमसिंघ खालसा, प्रविण शिवाजी पाटील, निखील नरहरराव भगत, अशोक रमेश सोनवणे, कृष्णा विजय खंडागळे, लक्ष्मण उध्दव पवार, सुनिल किसन राठोड, सलमान खान सुनेअलीखान, मोहम्मद इमरान मोहम्मद सरवर आदींना आरोपी करण्यात आले आहे. या धाब्यांमध्ये दारु विक्री करणारे आणि दारु पिणारे यांच्याकडे अनुक्रमे 1 लाख 40 हजार आणि 23 असा एकूण 1 लाख 63 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. ही कार्यवाही अतुल कानडे, व्ही.पी.हिप्परगेकर, एस.एम.शेख, आनंद चौधरी, एम.एम. बोदमवाड, ए.एम. पठाण यांनी केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार ढाबा मालक आणि 17 पिदाडींवर केली कार्यवाही