नांदेड(प्रतिनिधी)-पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी वळण रस्त्यावर हिसकावले आहे. देशमुख नगरी तरोडा (बु) येथे एक घरफोडून चोरट्यांनी 69 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरला आहे. संभाजीनगर कमान तरोडा येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे.वीज वितरण कंपनीची 1 लाख 53 हजार रुपये किंमतीची ऍल्युमियम तार चोरण्यात आली आहे. ऍटोत प्रवास करतांना एका महिलेची सोन्याची अंगठी चोरण्यात आली आहे.
भागिरथाबाई विठ्ठलराव शिंदे या 60 वर्षीय महिला 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 6.30 या वेळे दरम्यान वळण रस्त्यावर पायी चालत असतांना त्यांच्या सोबत मंगलाबाई चिकणे या पण होत्या. त्यावेळी महाराष्ट्र गे्रनाईट गॅलरीसमोर त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 2.5 ग्रॅम वजनाचे मनीमंगळसुत्र तोडून पळून गेले आहेत. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बुरकुले अधिक तपास करीत आहेत.
शिक्षक माणिकराव गोविंदराव मस्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान त्यांचे देशमुखनगरी तरोडा (बु) येथील घर बंद होते. त्यांच्या घरात कोणी तरी चोरट्यांनी प्रवेश करून 69 हजार 600 रुपये किंमतीचे दागिणे चोरून नेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गोणारकर अधिक तपास करीत आहेत.
अर्चना धम्मपाल नरवाडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जी.0493 ही तरोडा (बु) येथून 4-5 नोव्हेंबरच्या रात्री चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 40 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील वीज वितरण कंपनीचे अभियंता संदीप भंडारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर या दिवसात मौजे शिनगारवाडी ता. भोकर येथील गोविंदराव मुसळे यांच्या शेतातील वीज खांबांवर असलेले 3 हजार 200 मिटर ऍल्युमिनियम वायर चोरट्यांनी तोडून नेले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आलेवार अधिक तपास करीत आहेत.
छायाबाई मारोती कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 नोव्हेंबर रोजी त्यांनी सराफा भागातून एक तोळे वजनाचे सोन्याचे एड विकत घेतले. त्यांनी बर्की चौकातून ऍटोत प्रवास केला. घरी जावून पाहिले तर नवीन घेतलेले एड चोरीला गेले होते. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कस्तुरे अधिक तपास करीत आहेत.
पायी चालणाऱ्या 60 वर्षीय महिलेचे मंगळसुत्र तोडले; इतर चोऱ्या