नांदेड(प्रतिनिधी)-पुढील आठवड्यात होणाऱ्या सिनेट अधिसभा निवडणुक 2022 साठी सम्यक पॅनलच्यावतीने 5 उमेदवारांचे एक पॅनल आज जाहिर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी काम करणार असल्याचे या उमेदवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सम्यक पॅनल सिनेट अधिसभा निवडणुक 2022 मध्ये नोंदणीकृत पदवीधरांच्या गटातून खुल्या प्रवर्गात राजू मधूकरराव सोनसळे, ऍड. यशोनिल उत्तम मोगले, साहेब भिवा गजभारे तसेच महिला गटातून निराली माणिक काळगापूरे आणि डीएनटीव्हीजेएनटी गटातून सायबु शंकरराव बेळे अशा प्रकारे हे उमेदवार सिनेट अधिसभा निवडणुक लढवणार आहेत. येत्या 13 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एकूण 11 हजार मतदार आहेत. शाळा, महाविद्यालय येथे काम करणारे याचे मतदार असतात. नांदेड , हिंगोली, परभणी, लातूर अशी या सिनेट अधिसभा निवडणुकीसाठी मतदारांची व्याप्ती आहे.
या प्रसंगी आपले मत व्यक्त करतांना उमेदवार प्रा. राजू सोनसळे म्हणाले की, सिनेट सभेची ताकतच उमेदवारांना माहित नसते आणि सदस्य म्हणून निवडूण आल्यानंतर ती ताकत माहित नसल्यामुळे तेथे काय करावे याची जाण नसते. अशा परिस्थिती ही सिनेट अधिसभा विद्यापीठाअंतर्गत चालत असते. आम्ही निवडूण आल्यानंतर विविध प्रकारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना केंद्र बिंदु मानुन काम करणार आहोत.

याप्रसंगी ऍड. यशोनिल मोगले म्हणाले की, सिनेट सदस्य संस्था चालकांच्या हातातील बाहुले असतात. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणारे, त्यांचा अन्याय दुर करणारे व्यक्ती या सिनेट अधिसभेत निवडूण दिले पाहिजेत.
याप्रसंगी उमेदवार निराली काळगापूरे म्हणाल्या की, विद्यापिठात सुध्दा महिलांवर अनेक अन्याय होतात. या अन्यायाला योग्य वाचा फोडण्याची तयारी ठेवून मी या निवडणूकीत जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. महिलांविषयी व्यासपीठावरून भरपूर काही बोलले जाते पण प्रत्यक्षात त्याची काही अंमलबजावणी मात्र होत नाही. ही अंमलबजावणी व्हावी म्हणून सम्यक पॅनल प्रयत्न करणार आहे. याप्रसंगी इतर उमेदवार सायबू बेळे, आणि साहेब गजभारे यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले.
आजपर्यंतच्या सिनेट अधिसभा निवडणुकीत प्रस्तापितांची चलती राहिली सम्यक पॅनलने आपले आवाहन उभे करून या निवडणुकीत एक नवीन चॅलेंज आणले आहे.