नांदेड(प्रतिनिधी)-आंध्र प्रदेशच्या सिमेजवळ असलेल्या अनुसयानगर, सिगरोळी गावाजवळ गावाबाहेर जंगलात एका 25 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यदेह सापडला आहे. ही महिला तर अनोळखी आहेच. तिचे मारेकरी सुध्दा अनोळखीच आहेत. पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
आज दि.8 नोव्हेेंबरच्या सकाळी 11 वाजेच्यासुमारास पोलीस ठाणे बिलोलीच्या हद्दीतील सगरोळी गावाजवळ अनुसयानगरच्या गावाबाहेर जंगलात एका 25 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला. याबाबतची माहिती मिळताच बिलोलीचे पोलीस निरिक्षक सुधाकर डोईफोडे, स्थानिक गुन्हाशाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी अनुसयानगरकडे धाव घेतली आहे. त्या ठिकाणी दिसणाऱ्या परिस्थितीनुसार या अनोळखी महिलेचा कोणीतरी अनोळखी माणसांनी खून करून तिचा मृतदेह अनुसयानगरजवळ जंगलात आणून फेकला आहे असा प्राथमिक अंदाज आहे. वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाने कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता असंख्य पोलीस अधिकारी घटनास्थळीच असल्याने त्या ठिकाणी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अंमलात आणून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
सगरोळीजवळील अनुसयानगरच्या जंगलात 25 वर्षीय अनोळखी महिलेचा खून