नांदेड(प्रतिनिधी)-पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आदेशदिल्यानंतर सुध्दा शहरातील पोस्टर, बॅनर काढले गेले नाहीत. यामुळे आता कोण जिंकले कोण हारले आम्हीच लिहावे काय? स्पष्टपणे दिसते आमदार जिंकलेे. राजकीय व्यक्तींमध्ये कितीही बे बनाव असला तरी ते काही बाबींमध्ये एक-दुसऱ्यावरचे आरोप बाजूला ठेवतात हे सुध्दा या निमित्ताने पाहायला मिळाले. आज ज्यांना पोस्टर, बॅनरवर आक्षेप आहे. त्यांचेही पोस्टर बॅनर अशाच प्रकारे लागतात. म्हणून बहुदा ते गप्प होतात.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर हा प्रवास करणार आहे. तो प्रवास सुरू आहे. 1 नोव्हेंबरपासूनच नांदेड शहरात वेलकम राहुल गांधी या आशयाचे हजारो पोस्टर, बॅनर लावण्यात आले. त्यात बनर लावणाऱ्यांचे फोटो, त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो, स्थानिक नेत्यांचे फोटो अशा मोठ्या व्याप्तीचे बॅनर बनवले गेले. या बनर्सवर काही जणांना आक्षेप आला. तो आक्षेप यासाठी महत्वपुर्ण आहे की, राहुल गांधी यांची यात्रा आणि ती ज्या मार्गावरून जाणार नाही त्या मार्गावर सुध्दा पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यासोबत दुसरी संधी अशी आहे की, आपल्याला मिळालेली बोलण्याची संधी कोणीच गमावू इच्छीत नाही आणि आलेल्या संधीचे सोने करत सर्व विरोधकांनी या बाबीला जोरदारपणे उचलले.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन हे पहिल्यांदा 4 नोव्हेंबर रोजी नांदेडला आले होते. या भेटीमध्ये त्यांनी दिलेल्या मुलाखतीत पत्रकारांना सांगितले की, मी मनपा आयुक्तांना माझ्यासह सर्व अवैध पोस्टर आणि बॅनर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.पण आज 9 नोव्हेंबर आहे. आजच्याही परिस्थितीत कोणतेही बॅनर्स आणि पोस्टर काढले गेले नाहीत. काय कारण असेल याचे याचे उत्तर स्पष्ट आहे. नांदेड शहरात किंबहुना नांदेड जिल्ह्यात ज्या पध्दतीने अशोक चव्हाण यांची पकड आहे त्या विरोधात कोणत्याही व्यक्तीची तशी पकडल प्रशासनावर नाही का असा प्रश्न या पोस्टर्समुळे समोर आला आहे.
राजकीय व्यक्तींमध्ये कितीही बेबनाव असला तरी काही शब्दांमध्ये, काही घटनांमध्ये ते कोणीही एक दुसऱ्यांविरुध्द जास्तीचे बोलत नाहीत याचे कारण असे आहे की, कधी दुसऱ्याची पण वेळ असते आणि त्यावेळी पहिला बोलत नाही. म्हणूनच आजच्या परिस्थिती पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आदेश दिले असले तरी प्रशासनावरील अशोक चव्हाणांची पकड किती मजबुत आहे हे दिसते. अशोक चव्हाण यांनी आता आपल्या तिसऱ्या पिढीला सुध्दा राजकीय क्षेत्रात वावर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पुढे सुध्दा त्यांची जिल्ह्याच्या प्रशासनावरील पकड कायम राहिल असेच म्हणावे लागेल.
राजकीय व्यक्तींमध्ये घडणारे प्रसंग हे मात्र किती सत्य आहे, त्यातून काय लपवले आहे, काय खोटे आहे आता हे लिहिण्याइतपत गरज राहिलेली नाही. कारण जनता आता शिक्षीत झाली आहे. त्यांना तुमच्या एका घटनेतून काय शोधायचे आहे ते स्वत: शोधतात त्यामुळे प्रत्येक शब्द किंवा घटना शब्दातून व्यक्त करण्याची गरज नाही. शब्दांच्या पलिकडचा मर्म जनता समजते आहे त्यामुळे आजच्या परिस्थितीत आमदार जिंकले असेच म्हणावे लागेल.
पोस्टर, बॅनर युध्द; आमदार चव्हाण जिंकलेच