नांदेड(प्रतिनिधी)-संत दासगणु पुलावरून उडी मारण्याच्या बेतात असणाऱ्या एका महिलेला गोदावरी जीवरक्षक दलाच्या एका सदस्याने वाचवले आहे.
आज दुपारी 3 वाजेच्यासुमारास एक 25-30 वर्षीय महिला संत दासगणु पुल नावघाट येथून नदीत उडी मारण्याच्या बेतात असतांना तिचीही मनशा तेथील गोदावरी जीवरक्षक दलाचे सदस्य सय्यद अशफाख यांनी ओळखली त्यांनी त्वरीत त्या महिलेला नदीत उड्डी मारण्यापासून वाचवले आणि सदरची माहिती इतवारा पोलीसांना दिली. इतवारा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब स्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या महिलेला ताब्यात घेवून पोलीस ठाणे इतवारा येथे नेले. सय्यद अशफाख यांनी केलेल्या मेहनतीसाठी आणि जागृकतेसाठी त्यांचे कौतुक होत आहे.
संत दासगणु पुलावरून नदीत उड्डी मारण्याच्या बेतात असणाऱ्या महिलेला वाचवले