नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव पोलीसांनी 12 तासात तीन दुचाकी चोरांना पकडले.या चोरट्यांना हदगाव न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.8 नोव्हेंबर रोजी हदगाव पोलीस ठाण्यात एक दुचाकी चोरी झाली. त्या बाबतचा गुन्हा क्रमांक 318/2022 दाखल झाला.हा चोरीचा प्रकार करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी हदगाव पोलीसांनी पोफाळी जि.यवतमाळ येथे जावून संतोष दत्ता राऊत (20), ओम रमेश चंद्रवंशी (18), अब्दुल अरबाज अब्दुल कयुम (20) सर्व रा.भगतसिंघ चौक नाथनगर ता. उमरखेड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 8 नोव्हेंबर रोजी चोरी झालेली मोटारसायकल जप्त केली. हदगाव न्यायालयाने या तिन जणांना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.ही कार्यवाही करणारे हदगावचे पोलीस निरिक्षक जे.जी.पवार, सहायक पोलीस निरिक्षक एस.जी.पांढरे, एस.टी.गायकवाड, पोलीस अंमलदार हंबर्डे आदींचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, भोकर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक शफकत आमना यांनी कौतुक केले आहे.
हदगाव पोलीसांनी 12 तासात दुचाकी चोर पकडले