नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील किल्ला, चौफाळा, कौठा, वसरणी, असर्जन आदी जलकुंभांमधून होणारा पाणी पुरवठा 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता यांनी जनतेला केले आहे.
नांदेड शहरातील असदवन जलशुध्दीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिणी, लातूरफाटा येथे क्षती झाली आहे. म्हणून या वाहिणीला स्थलांतरीत करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग मार्फत करण्यात येणार आहे. म्हणून पुढील दोन दिवस अर्थात 10 आणि 11 नोव्हेंबर दरम्यान असदवन जलशुध्दीकरण केंद्रातून किल्ला, चौफाळा, कौठा, वसरणी, असर्जन या भागातील जलकुंभांना पिण्याचा पाणी पुरवठा होणार नाही. पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी पुढील दोन दिवस लागणार आहेत तरी नागरीकांनी याची नोंद घ्यावी आणि पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
10 आणि 11 नोव्हेंबर रोजी काही भागात पाणी पुरवठा होणार नाही