नांदेड(प्रतिनिधी)- एका चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जावून 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काशिनाथ व्यंकटराव पवार मुळ रा.आमुदरा ता.मुदखेड जि. नांदेड यांचे नांदेड शहरातील जिजामाता बॅंक कॉलनी आनंदनगर येथे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी अवतारसिंग नानकसिंग रामगडीया हा व्यक्ती आला आणि त्याने बांधकाम थांबवले. मला 30 लाख रुपये खंडणी दिली नाही तर मिस्त्री लोकांचे तंगडे तोडतो, वाचमनला खतम करतो अशी धमकी सुध्दा दिली. काशीनाथ पवार यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 387, 506 नुसार गुन्हा क्रमांक 387/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव हे करीत आहेत.
30 लाखांची खंडणी मागणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल