नांदेड(प्रतिनिधी)-तुझ्या मुलाची फिल्डींग लावतो आणि असे करायचे नसेल तर मला दोन पेटी दे.. अशी धमकी देणाऱ्या खंडणीखोराला नांदेड ग्रामीण पोलीसांनी अटक केली.
पांडूरंग बालाजी काकडे रा.रविनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास त्यांच्या फोन क्रमांक 9422173650 वर फोन क्रमांक 8600597725 वरून संदीप उर्फ बंटी रत्नाकर जाधव रा.बसवेश्र्वरनगर कौठा या व्यक्तीने फोन केला आणि तुझा मुलगा साई याच्या जीवीतास काही बरे वाईट करील तसे करायचे नसेल तर मला दोन पेटी (दोन लाख रुपये) खंडणी दे अशी माणगी केली. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 671/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 386 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बालाजी नरवटे यांच्याकडे देण्यात आला आहे. नरवटे यांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या संदीप उर्फ बंटी रत्नाकर जाधव यास अटक केली. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी न्यायालयाने खंडणीखोराला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.प्राप्त माहितीनुसार खंडणीचा फोन आल्यानंतर ट्रॅप लावून या खंडणीखोराला पकडण्यात आले.
दोन पेटी दे नाही तर तुझ्या मुलाची फिल्डींग लावतो म्हणारा पोलीस कोठडीत