नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या दबंग पोलीस उपनिरिक्षकाने मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून 1420 रुपये रोख रक्कम जप्त करून जबरदस्त कार्यवाही केली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस उपनिरिक्षक डॉ.परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी जंगमवाडी जाणाऱ्या रस्त्यावर देशी दारु दुकानाच्या शेजारी मोकळ्या जागेत चालणाऱ्या मिलन डे ओपन नावाच्या जुगारावर धाड टाकली. त्या ठिकाणी जुगार खेळ व खेळवित असलेल्या लोकांना पकडले. त्यांच्याकडून 1420 रुपये रोख रक्कम जप्त केली. उत्तम बाबूराव गजभारे (62) धंदा मजुरी, रा.देगावचाळ या जुगार चालकाला अटक केली. जुगार खेळणाऱ्याची नावे या तक्रारीत लिहिलेली नाहीत. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी मुंबई जुगार कायद्याच्या सर्वात मोठ्या कलम 12 नुसार गुन्हा क्रमांक 411/2022 दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार मंगनाळे हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे दबंग पोलीस उपनिरिक्षक चव्हाण यांनी केली मोठी कार्यवाही