वंचित घटकांतील लोकांचा आधार आम आदमी पार्टी -ॲड.जगजीवन भेदे

 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी च्या जनसंवाद या कार्यक्रमा अंतर्गत बिलोली येथील दिशाकेंन्द्र येथे आम आदमी पार्टी ची नुतन कार्यकारणीची निवड प्रक्रीया पार्टी चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम पांगरीकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छ.शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व कार्यक्रमाचे उद्घघाटन मान्यवरांचे हास्ते करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे नेते मोहन पाटील उमरेकर, नांदेड उत्तर व दक्षीण विधानसभा प्रमुख ॲड.जगजीवन भेदे व युवा नेता अदील जहागिरदार यांच्या प्रमुख उपस्थीती होती.यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतानां ॲड.जगजीवन भेदे म्हणाले की,आपल्या देशाला स्वातंत्र मिळून आज पर्यंत ७५वर्ष झाले.पंरतु लोकशाही चा केंन्द्रबिंन्दु असलेला आम आदमी हा विकासापासून वंचितच राहीलेला आहे.आम आदमी च्या मुलभुत विकासाकडे व भारतीय संविधानाची तंतोतंत अमंलबजावणी आज पर्यत सरकारनें दुर्लक्षच केले आहे.आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक मा.अरविंद केजरीवालांनी त्यांच्या नेतृत्वात दिल्ली व पंजाब सरकारणे भारतीय संविधानाची अमंलबजावणी ख-या अर्थाने करून आपल्या देशातील वंचित,उपेक्षितांचे मुलभुत प्रश्न सोडविले.म्हणुन सध्या आम आदमी पार्टी ही वंचित घटकांची आधार बनली आहे असे परखड मत ॲड.जगजीवन भेदे यांनी व्यक्त केले.यावेळीं पार्टीचे जेष्ट नेते मोहन पाटील शिरसाठ उमरेकर,अदिल जहागीरदार यांचीही समोयचीत भाषणें

झाली.जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आम आदमी पार्टीच्या बिलोली तालुका संयोजक पदी श्री.सत्यजित एकनाथ जाधव यांची निवड केली आहे असे घोषित करून त्यांचे स्वागत केले.यावेळी बिलोली तालुका संयोजक श्री.सत्यजित जाधव यांनी आम आदमी पार्टी च्या विचारांशी एकरूप होऊन बिलोली नगरपरिषदेवर येत्या निवडणुकीत झेंडा लावण्याचा निश्चय व्यक्त केला.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय जाधव, संदीप जाधव,मकरंद काळेवार,किशन जाधव,शिलरत्न जाधव,हर्षवर्धन पोवाडे, संघपाल जाधव,कपिल नागणीकर,दत्ता वाचलवार,गंगाधर देवकरे,गौतम काळे,भास्कर कुडके,किर्तीरत्न जाधव,सुरेश जाधव,यांनी परिश्रम घेतले या वेळी बिलोली तालुका व शहरातील असंख्य नागरीक उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *