नांदेड(प्रतिनिधी)-मध्य रेल्वेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद या रेल्वे स्थानकादरम्यान तसेच पुढे कल्याणपर्यंत काही भागात मेगा ब्लॉक असल्याने मराठवाड्यातून जाणाऱ्या 13 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच एक गाडी अंशता: रद्द झाली आहे. रद्द झालेल्या गाड्यांच्या तारखा 19, 20, 21 नोव्हेंबर आहे.
दक्षीण मध्य रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद रेल्वे स्थानक दरम्यान होणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे नांदेड येथून मुंबईकडे जाणाऱ्या दि.19 रोजीच्या पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या गाड्या पुढील प्रमाणे आहेत. गाडी क्रमांक 17618- तपोवन एक्सप्रेस(नांदेड-मुंबई), गाडी क्रमांक 17611-राज्य राणी एक्सप्रेस (नांदेड-मुंबई), गाडी क्रमांक 17058-देवगिरी एक्सप्रेस(सिकंदराबाद मुंबई), गाडी क्रमांक 11402-आदिलाबाद मुंबई ही गाडी अंशता: रद्द करत ती फक्त दादरपर्यंत धावणार आहे. या व्यतिरिक्त दि.20 नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक 12072 जनशताब्दी एक्सप्रेस(जालना-मुंबई) ही रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11402 नंदीग्राम एक्सप्रेस (आदिलाबाद-मुंबई) ही गाडी 21 नोव्हेेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. मुंबईहुन नांदेडकडे येणाऱ्या 20 नोव्हेंबरच्या पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक 17617-तपोवन एक्सप्रेस(मुंबई-नांदेड), गाडी संख्या 12071- जनशताब्दी एक्सप्रेस(मुंबई-जालना), गाडी संख्या 11401-नंदीग्राम एक्सप्रेस(मुंबई-आदिलाबाद). गाड ी संख्या-17612-राज्य राणी एक्सप्रेस (मुंबई-नांदेड), गाडी संख्या-17057-देवगिरी एक्सप्रेस(मुंबई सिकंदराबाद) या गाड्या रद्द आहेत. तसेच 21 नोव्हेंबर रोजी मुंबई येथून सुटणारी गाडी संख्या 17617-तपोवन एक्सप्रेस (मुंबई-नांदेड) ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
19, 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी एकूण 13 रेल्वे गाड्या रद्द