नांदेड(प्रतिनिधी)-हदगावच्या पोलीस निरिक्षकांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून 9 जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 19 हजार 600 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुध्दा एका शेताच्या आखाड्यावर पोलीसांनी धाड टाकून तेथे चार जुगारी पकडले आहेत. त्यांच्याकडून 1310 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
हदगावचे पोलीस निरिक्षक जगन्नाथ गणपती पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 नोव्हेंबर रोजी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी पांडूरंग शिंदे यांच्या धाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत धाड टाकली. त्या ठिकाणी 8 जण झन्ना-मन्ना नावाचा 52 पत्यांचा जुगार खेळत होते. पोलीसांनी पकडलेले जुगारी आकाश रामराव सांगळे (25), राहुल उत्तम सांगळे (35) रा. करोडी ता.हदगाव, सुरेश देवराव मोरे (28), शेख इसराईल शेख इब्राहिम (60), अमदजखान कागदखान पठाण (27), शेख सिद्दीकी शेख बीबन (23), संजय निवृत्ती तिवाळे(40) सर्व रा.हदगाव आणि विश्र्वजित अशोक राऊत मुळ रा.सिडको नांदेड ह.मु. ल्याहरी ता.हदगाव असे आहेत. या सर्वांकडून पोलीसांनी 19 हजार 600 रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.हदगाव पोलीसांनी या प्रकरणी आठ जणांवर मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 322/2022 दाखल केेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार हंबर्डे करीत आहेत.
अर्धापूरचे पोलीस उपनिरिक्षक साईनाथ काशिनाथ सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 नोव्हेंबरच्या दुपारी 4 वाजेच्यासुमारास खरब शिवारात आसीफ काझी यांच्या भुखंडाच्या शेजारी असलेल्या आखाड्यावर काही जण जुगार खेळत होते. हा अंदर बाहर नावाचा 52 पत्यांचा जुगार अर्धापूर पोलीसंानी धाड टाकून पकडला. जुगार खेळणारे वसीम अखाणी कुरेशी (32) रा.मुल्लागल्ली अर्धापूर, गोविंद गंगाराम जाधव (35) रा.वरुड जि.हिंगोली, मुस्ताकोद्दीन खतीब मसरोद्दीन खतीब (38) रा.इंदिरानगर अर्धापूर, मतीन अली खान अहेमद अली खान (32) रा.मदीनानगर अर्धापूर अशी आहेत. या सर्वांविरुध्द अर्धापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 303/2022 मुंबई जुगार कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे. अर्धापूरचे पोलीस अंमलदार कांबळे अधिक तपास करीत आहेत.
या कार्यवाहीसाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणे आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक शफाकत अमन्ना यांनी हदगाव आणि अर्धापूर पोलीसांचे कौतुक केले आहे.
हदगाव आणि अर्धापूर पोलीसांनी 52 पत्यांच्या अड्ड्यावर धाड टाकून 12 जुगार पकडले