नांदेड स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरिक्षक खुर्चीचे डोहाळे राईंदर उर्फ सोंगाड्या पोलीस निरिक्षकांना पण लागले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची मिळविण्यासाठी भरपूर पोलीस निरिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यात सध्या नांदेड जिल्ह्यात नसलेल्या काही राईंदर उर्फ सोंगाड्या पोलीस निरिक्षकांचा सुध्दा समावेश आहे. त्यातील काही जणांची तर सेवा फक्त सहा महिने शिल्लक राहते त्यांना सुध्दा नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखा खुर्चीचे डोहाळे लागले आहेत.
कोणत्याही जिल्ह्यात काम करतांना स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती मिळणे हा एक खुप मोठा आदराचा मान मानला जातो. त्यासाठी त्याच्या काही पात्रता पण आहेत. या पात्रतांव्यतिरिक्त त्या पोलीस निरिक्षकांच्या धमन्यांमधील रक्तात तो डीएनए असावा लागतो ज्यातून ती खुर्ची सांभाळण्याची ताकत मिळते. असेच पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर यशस्वीपणे काम करु शकतात. नाही तर काही सुर्याजी पिसाळ वृत्तीची मंडळी सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर बसण्याच्या तयारीत असते. पण त्यात सर्वात मोठा धोका असा होतो की, मुळ जिल्ह्याचे सरदार पोलीस अधिक्षक असतात पण पोलीस अधिक्षकांना फाटा देवून कोण्या तरी तिसऱ्याच व्यक्तीच्या सांगण्यावर ही मंडळी आपले जीवन चालवते. अशा परिस्थितीत स्थानिक गुन्हा शाखेचा कारभार तसेच पोलीस अधिक्षकांची व्यक्तीश: होणारी समस्या या पोलीस प्रक्रियेत मोठे बाधा आणत असते. जगात एक वाक्य आहे. बॉस इज ऑलव्हेज राईट, इफ ही इज रॉंग दॅन सी रुल नंबर 1 मीन्स बॉस इज ऑलव्हेज राईट या पध्दतीने चालणाऱ्या मंडळीची पोलीस दलात मोठी वाणवा झाली आहे. कारण प्रत्येक जण काही तर पाठबळ घेवून येतो आणि त्या पाठबळाच्या आधारावर मीच मालक असल्याची भ्रांती पसरविण्याचा प्रयत्न करतो. या भ्रांतीतून वेगवेगळ्या समस्या तयार होतात आणि या समस्यातून पोलीस प्रक्रिया अडचणीत येते.
स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा विशेष शाखा या अशा दोन शाखा प्रत्येक जिल्ह्यात आहेत. ज्यांना पोलीस अधिक्षकांचा उजवा हात आणि डावा हात असे मानले जाते. या दोन्ही हातांमधील एक हाताची बाजू कमजोर झाली तर त्यामुळे पोलीस अधिक्षकांच्या कारभारात मोठ्या समस्या येवू शकतात. या दोन शाखांमधील अधिकारी एवढे सक्षम हवेच की त्यांनी पोलीस अधिक्षकांच्या प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षराच्या उच्चारानंतर पोलीस अधिक्षक काय बोलणार आहेत याची कल्पना त्यांना यायला हवी तरच हा सर्व खेळ योग्यरितीने चालतो नसता यात अनेक समस्या तयार होणारच असतात. मग कोणता पोलीस अधिक्षक अशा माणसाला आपला उजवा हात बनवेल. हा प्रश्न नांदेडच्या नुतन पोलीस अधिक्षकांसमोर आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरिक्षकांना सन 2022 च्या शेवटच्या दिवशी तीन वर्षपुर्ण होतील. मागील खंडीभर वर्षांमध्ये तीन वर्ष पुर्ण करणारे हे एकच पोलीस निरिक्षक आहेत. या पध्दतीतून त्यांनी तीन वर्ष केलेल्या कालखंडाचा कारभार विश्लेषीत केला तर तो मोठा उज्वल आहे. अनेकांना आपल्या तोंडात बोटे टाकावी लागतील असा कारभार यांनी केलेला आहे आणि या परिस्थितीत त्यांचा कार्यकाळ पुर्ण होतो तेंव्हा त्यांची सेवा सुध्दा सहा महिनेच शिल्लक राहते. शासनाच्या नियमावलीप्रमाणे असा कमी सेवा कार्यकाळ शिल्लक राहिलेला असेल तर त्या अधिकाऱ्याला त्याच्या मागणीप्रमाणे नियुक्ती द्यावी लागते आणि ही नियुक्ती मागतांना आपली सेवा सहा महिने शिल्लक राहिलेल्या अधिकाऱ्याने हीच जागा मागितली तर किती लोकांच्या स्वप्नांचा चुराडा होईल. यात महत्वपुर्ण असेही आहे की, राईंदर उर्फ सोंगाड्या यांचा मुळ जिल्हा नांदेड नसतांना सुध्दा त्यांनी या जिल्ह्यात आपल्यासाठी कमवलेली जागा ही कशी-कशी कमावली हे त्यांच्या शिवाय दुसरा कोण सांगेल. असो आपल्या कार्यालयात देवदर्शनाला जात आहे असे लेखी लिहुन देणारे आणि विदेशात जाणारे पोलीस निरिक्षक आपला पासपोर्ट आणि बॅंक कागदपत्र हरवल्याचा खोटा अर्ज देतात ज्यामध्ये पासपोर्ट नंबर लिहिलेला नाही, बॅंक खात्याचा क्रमांक लिहिलेला नाही अशा या महान लोकांना आपल्याला स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती मिळावी अशी अपेक्षा आहे. आपण विचार करतांना भरपूर काही विचार करतो त्यात पोलीस अधिक्षकाला काय दुसरे पाहण्याची गरज आहे. त्यांना तर सर्व काही बसल्या जागी मिळते असे ऐकतो पण अशा राईंदरांकडून, सोंगाड्यांकडून पोलीस अधिक्षक काय अपेक्षा करतील आणि काय त्यांना मिळेल याबद्दल न लिहिलेलच बरे. अशा या राईंदरांना, सोंगाड्यांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील खुर्ची मिळावी याचे डोहाळे लागणे म्हणजे नांदेड जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेचे काय हाल पुढे होतील याची कल्पनाच न केलेली बरी. देव अशा राईंदरांच्या नियुक्तीपासून नांदेड जिल्ह्याला वाचवेल अशी विनंती करण्यापेक्षा जास्त कायही करणे अशक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *