नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 96 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड शहरातील भाग्यनगर-2, वजिराबाद-1 इतवारा-1,शिवाजीनगर-1 आणि कंधार-1 अशा सहा दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
अक्षय दशरथ चिंचाळे रा. यादवनगर शिवाजी चौक लोहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 नोव्हेंबरच्या रात्री 10 ते 16 नोव्हेंबरच्या पहाटे 3 वाजेदरम्यान त्यांचे सर्व कुटूंबिय घरात झोपलेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या किचन दरवाजा ढकलून आत आले आणि कोंडा तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे, मोबाईल, चार्ज, रोख रक्कम असा 4 लाख 96 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. हा गुन्हा लोहा पोलीसांनी दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.
शहरातील भाग्यनगर भागातून दोन आणि शिवाजीनगर, इतवारा, वजिराबाद, आदी भागातून एक-एक आणि कंधार येथून एक अशा सहा दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोहा येथे घरफोडून 4 लाख 97 हजारांचा ऐवज लंपास