नांदेड(प्रतिनिधी)-आदमपूर ता.बिलोली येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर तेथे सुरू असणाऱ्या अवैध वैद्यकीय व्यवसायीकांविरुध्द आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.मोहन माणिकराव देवराय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.14 नोव्हेंबर रोजी आदमपूर गावात डॉ.माका यांच्या शेजारी संभाजी दिगंबर भुरे हे अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली तेंव्हा त्यांनी तेथे भेट दिली. ते वैद्यकीय व्यवसाय करू शकतात याबद्दल कोणतेही पुरावे त्यांनी दिले नाहीत.रामतिर्थ पोलीसांनी या तक्रारीवरुन महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 2000 च्या कलम 33(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक इंगळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बोगस डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल