नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगोली रोड उड्डाणपुलाच्या खाली एक जबरी चोरी झाली आहे. तसेच बोरगाव ता. भोकर येथे एक घरफोडी झाली आहे. मुदखेड आणि वजिराबाद भागातून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.उस्मानगर पोलीस ठ ाण्याच्या हद्दीतून एक अखी हायवा गाडीच चोरीला गेली आहे.
मुजतबा अहेमद सिद्दीकी हे 30 वर्षीय व्यक्ती 16 नोव्हेंबरला मध्यरात्रीनंतर 1 वाजता हिंगोली गेट उड्डाणपुलाच्या खालून आपल्या दुचाकीवर जात असतांना 20 जण आले आणि त्यांनी आपली दुचाकी सिद्दीकीच्या दुचाकीसमोर उभी करून त्यांच्या खिशातील 7 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. या झटापट्टीत दरोडेखोरांनी सिद्दीकीच्या उजव्या हातावर खंजीर मारून त्यांना जखमी केले. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे अधिक तपास करीत आहेत.
राजेन्ना लिंगन्ना दुमलोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बोरगाव रोड, सोनटक्के कॉलनी येथे त्यांचे घर आहे.16 नोव्हेंबरच्या रात्री 11 ते 17 नोव्हेंबरच्या सकाळी 5 वाजेदरम्यान ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. या संधीत चोरट्यांनी त्यांचे घरफोडले आणि सोन्याचे दागिणे आणि इतर साहित्य चोरून नेले. या ऐवजाची किंमत 53 हजार रुपये आहे. मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शाम आनंदा बतकलवाड यांची 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. इंजि.संदीप रामचंद्र निखाते यांची 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बसस्थानकामधून चोरीला गेली आहे.
मारतळा येथे उभी असलेली 15 लाख रुपये किंमतीची हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 ए.डी.2410 ही 8-9 नोव्हेंबरच्या रात्री चोरीला गेली आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी ; उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हायवाय चोरी