नांदेड,(प्रतिनिधी)- काल रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांची उपविभागात गस्तीची नाईट ड्युटी असतांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी दोन जागी दरोडे टाकले आहेत.यात एक व्यक्तीला दरोडेखोरांनी शरीरावर अनेक जागी जखमा केल्या आहेत.
आज सकाळी सरकारी रुणालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दवाखान्यात रात्री जखमी अवस्थेत राहुल,रवींद्र आणि सुरेवाड असे तीन जण आले.त्यातील राहुलच्या दंडावर,पाठीवर अनेक जागी चाकू किंवा खंजीरने मारून जखमा केलेल्या होत्या.त्यातील दोघांना लागलेल्या जखमांचे गांभीर्य जास्त नसल्याने त्यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. राहुल यास जास्त मार असल्याने त्यावर वृत्त लिहीपर्यंत त्यावर उपचार सुरूच होते.
या संदर्भाने जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता जखमी मधील काही जणांना कँसर हॉस्पिटल समोर रस्त्यावर रोखून त्यांना मारहाण करून लूट करण्यात आली होती.तसेच भगवानबाबा चौक येथे काही जणांना मारहाण करून लूट करण्यात आली आहे.काहीजण उपचार घेऊन घरी गेले आहेत.जखमी राहुलला जास्त काही सांगता आले नाही. याबाबत गुन्ह्याची माहिती निरंक प्राप्त झाली आहे.
बहुदा दरोडेखोरांना माहिती नसेल की,आज म्हणजेच काल रात्री श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांची रात्रीची गस्त आहे,नसता घडलेले दोन दरोड्याचे प्रकार करण्याची दरोडेखोरांची हिम्मत झाली नसती.