ग्रामीण सेवादल विभागाची बैठक
नांदेड (प्रतिनिधी)-आगामी काळात होणार्या निवडणूकीसाठी व पक्ष संघटन अधिक वाढविण्यासाठी ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी सेवादल विभागाची शाखा उभारावी व खंबीरपणे काम करावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल विभागाचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष डॉ.जानबा मस्के यांनी मत व्यक्त केले.
राष्ट्रवादी सेवादल ग्रामीण विभागाची आढावा बैठक दि.23 नोव्हेंबर रोजी आयटीआय येथे आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, सेवादलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.जानबा मस्के, मराठवाडा अध्यक्ष नवनाथ गायकवाड, सेवादलचे माजी अध्यक्ष रामनारायण बंग, प्रा.डी.बी.जांभरूनकर, सेवादलचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश गांजापुरकर, सुभाष गायकवाड, प्रांजली रावणगावकर, बाबुराव कोटलवाड आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रदेश अध्यक्ष मस्के म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सदस्य नोंदणी झाली पाहिजे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे महाराष्ट्र दिन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हे सर्व झेंडावंदनाचे कार्यक्रम सेवादल विभागाने घेतले पाहिजे. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी करावे व खंबीरपणे काम करावे असे ते म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांचे विचार ग्रामीण भागापर्यंत पोहचले पाहिजे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार सेवादल काम करीत आहे. यापुढेही नांदेड ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे काम सेवादलाने करायला हवे असे ते म्हणाले. तसेच नांदेड जिल्हा ग्रामीण सेवादलचे जिल्हाध्यक्ष तथा आयोजक रमेश गांजापुरकर म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये राष्ट्रवादी सेवादलाची शाखा स्थापन करून जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांचे हाथ बळकट करण्यासाठी अधिक गतीने काम करू असे ते म्हणाले.
यावेळी हनमंत पाटील, डॉ.उत्तम सोनकांबळे, उत्कर्ष सुर्यवंशी, कृष्णा वाघमारे, बलविंदरसिंघ राठोड, भास्कर सोनाळे, मोहम्मद तनवींदर, मोहम्मदी शेख, आनंद सुर्यवंशी, तुळजाराम डोईजड, आर.आर.भोसले, संजय कोरे, श्रीदत्त घोडजकर, सुभाष रावनगावकर, गगनदिपसिंघ जहागीरदार, प्रकाश मांजरमकर, अजिंक्य देशमुख, बाबुराव कोटलवारे आदी जणांची उपस्थिती होती.