नांदेड(प्रतिनिधी)-डीजे लावण्याच्या कारणावरुन एका युवकाचा खून आणि खून करणाऱ्या गटातील एकावर जिव घेणा हल्ला असे परस्पर विरुध्द गुन्हे विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यातील जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार जणांना न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे.खून करणाऱ्या गटातील पाच आरोपींना विमानतळ पोलीसांनी आज 23 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे.
21 नोव्हेंबर रोजी कर्मविरनगर येथे वलीमा कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचण्याच्या कारणावर भांडण झाले. यात एका गटाने सोहेल खान नबीद खान (29) याला आणि त्याचा मित्र आसीफ खान या दोघांना जमीनीवर पाडून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने विटांनी आणि दगडांनी मारहाण करून जीवघेणी दुखापत केली होती. याबाबत गुन्हा क्रमांक 400/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 324, 323, 504 आणि 34 नुसार गुन्हा दाखल झाला.या प्रकरणात विमानतळ पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे.
याच घटनेच्या संदर्भाने दुसरा गुन्हा क्रमांक 399/2022 दाखल झाला. यात शेख मोईन शेख एकबाल या युवकाचा खून झाला. या प्रकरणात विमानतळ पोलीसांनी मोहम्मद कैफ मोहम्मद गौस (24), शेख इस्माईल उर्फ चौली महम्मद अली (25) हे दोघे फरार आहेत. इतर मोहम्मद जाकेर मोहम्मद ताहेर (23) तिघे रा. फारुखनगर नांदेड तसेच सोहेल खान नबीद खान (29) रा.सकोजीनगर, शेख आमेर उर्फ अम्मु शेख पाशा (23) रा.गोवर्धनघाट, मोहम्मद आसीफ मोहम्मद युनूस (24) रा.हमीदीया कॉलनी देगलूरनाका, सय्यद साजीक सय्यद मुजीब (22) रा.टायरबोर्ड नांदेड यांना अटक करण्यात आली आहे. विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक नृसिंह अनलदास, बाळू गिते, पोलीस उपनिरिक्षक नागोराव जाधव, गुन्हे शोध पथकाचे सर्व पोलीस अंमलदार आदींनी मेहनतकरून हे दोन गुन्हा उघडकीस आणून त्यातील गुन्हेगारांना गजाआड केले आहे.
वलिमा कार्यक्रमातील खून आणि जीवघेणा हल्ला प्रकरणात 9 जणांना अटक