नांदेड जिल्ह्यातील आयएएस अधिकारी सौम्या शर्मा, तुकाराम मुंडे यांच्यासह 7 जणांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता राज्य शासनाने 7 भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये अत्यंत नामांकित अधिकारी तुकाराम मुंडे आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक सौम्या शर्मा यांचाही समावेश आहे.
राज्य शासनाने बदल्या केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये 2006 च्या बॅचचे डॉ.व्ही.एन.सूर्यवंशी जे एम.एम.आर.डी.ए.मुंबई येथे अतिरिक्त आयुक्त होते. त्यांची नियुक्ती एक्साईज विभाग मुंबई येथे कमिशनर पदावर करण्यात आली आहे. 2012 च्या बॅचचे अधिकारी भाग्यश्री बन्यात ह्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांना विदर्भ सुरक्षा व विकास मंडळ नागपूर येथे नियुक्ती देण्यात आली आहे. 2011 बॅचचे आयएएस अधिकारी विनय सदाशिव मुन हे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा जिल्हा परिषद होते त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी अशी नियुक्ती देण्यात आली आहे. सन 2007 च्या बॅचचे अधिकारी सुनिल एस.चव्हाण यांची नियुक्ती कृषी आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे. 2013 बॅचचे अधिकारी एस.एम.कुरकोती यांना भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद देण्यात आले आहे.नांदेडच्या देगलूर येथे कार्यरत 2018 बॅचचे अधिकारी सौम्या शर्मा यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर अशी नियुक्ती मिळाली आहे. नामांकित अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या जीवनात त्यांच्या पुर्ण कार्यकाळाच्या वर्ष संख्येपेक्षा त्यांच्या बदली संख्या जास्त आहेत. त्यांना आता साईबाबा संस्था शिर्डी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *