नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे आरक्षण कार्यालयासमोर एका अनोळखी 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या अनोळखी मयताची ओळख पटावी म्हणून वजिराबाद पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे.
दि.28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ एक 60 वर्षीय अनोळखी माणसाचा मृतदेह सापडला.याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू क्रमांक 90/2022 फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 प्रमाणे दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार धोंडीराम केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.
वजिराबाद पोलीसांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार हा अनोळखी मयत माणुस 60 वर्ष वयाचा आहे. त्यांचा रंग सावळा आहे, चेहरा गोल आहे, उंची 5फुट 3 इंच आहे, शारीरिक बांधा मजबुत आहे, त्यांचे केस पांढरे आणि बारीक आहेत, त्यंाच्या उजव्या कानाच्या बाजूला तिळ आहे. मयताच्या अंगावर चौकडा पांढऱ्या रंगाचा हाफ बाह्याचा शर्ट आणि भुरकट रंगाचा पॅन्ट परिधान केलेला आहे.
पोलीस अंमलदार धोंडीराम केंद्रे यांनी जनतेला आवाहन केले की, या अनोळखी मयत माणसाच्या ओळखी बाबत आणि त्याच्या मृत्यबाबत कोणास काही माहित असेल तर त्या नागरीकाने पोलीस ठाणे वजिराबाद येथे त्याबद्दलची माहिती द्यावी. वजिराबाद पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-236500 यावर किंवा पोलीस अंमलदार धोंडीराम केंद्रे यांचा मोबाईल क्रमांक 9970381047 या फोनवर सुध्दा जनतेला माहिती देता येईल.
60 वर्षीय अनोळखी पुरूष जातीचे प्रेत सापडले; वजिराबाद पोलीसांनी जारी केली शोध पत्रिका