नांदेड(प्रतिनिधी)-पंचांगा प्रमाणे आज मार्गशीर्ष शुध्द सप्तमी आहे. पंचांगात आजचा दिवस शुभ दाखवलेला आहे. परंतू नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजचा शुभ दिवस अपघात दिवस ठरला आणि दोन जागी झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.
आज सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास तुप्पा पाटीजवळ हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जे. 9994 या गाडीने दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.व्ही. 4798 ला जबरदस्त धडक दिली. या धडकेत त्यावरील स्वार प्रदीप शिवाजी हातगडे रा.मुगट (20) नाव सांगण्यात आले. त्या युवकाच्या डोक्यावरून हायवाचे चाक गेल्यामुळे त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळी पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार आणि त्यांचे सहकारी पोहचले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जे.9994 चा परिवहन वाहतूक कार्यालयाच्या ऍपवर शोध घेतला असता ही गाडी हायवा नसून दुचाकी असल्याचे दाखवते. हायवा गाडीवर हा क्रमांक खडूने लिहिलेलेला आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम.एच.26 बी.जे.9994 असा आहे. आरटीओ कार्यालयाच्या ऍपवर या 9994 क्रमांकाच्या विमा संपलेला आहे असे दाखवते.
जवळपास दोन तासानंतर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बाभूळगाव पाटीजवळ पुन्हा एक अपघात घडला. या अपघातात टिपर क्रमांक एम.एच.26 बी.ई.8057 ने दुचाकी क्रमांक एम.एच.26 एफ 7603 ला जोरदार धडक दिली. या अपघातात जोशी सांगवी येथील गजानन रावसाहेब गुड्डेवार या युवकाचा टोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेच्या ठिकाणी कोणी पोलीस गेले याबद्दल माहिती मिळू शकली नाही. अशा प्रकारे नांदेड ग्रामीण पोलीसांसाठी आजचा शुभ दिवस अपघात दिवस ठरला.
