प्रमोद शेवाळे यांना विद्युत वितरण कंपनी
विजय कबाडे यांना बदली बदलून घेण्यात यश
निलेश मोरे यांना राज्य गुप्त वार्ता विभाग
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 29 नोव्हेंबर रोजी आयएएस अधिकाऱ्यांसह काही आयपीएस आणि काही मपोसे अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या केल्या आहेत.पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एकूण संख्या 29 आहे. त्यामध्ये बहुतेक जण नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. तर काहींना पुर्वी दिलेल्या नियुक्त्या बदलून दिल्या आहेत. दुसऱ्या सरकारबद्दल बोलणारे आजचे सरकार सुध्दा सर्व काही करते.नवीन आदेशांमध्ये पुन्हा काही जण प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या गृहविभागातील सहसचिव व्यंकेटश भट यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आदेशांमध्ये एकूण 29 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. इतर राज्यांच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या आजच्या सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना पहिली दिलेली बदलून नवीन बदल्या दिल्या आहेत. त्यामध्ये नांदेडचे अत्यंत कर्तव्यदक्ष अपर पोलीस अधिक्षक विजय व्यंकटराव कबाडे यांचाही समावेश आहे.
बदली झालेली अधिकारी आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या कंसात लिहिल्या आहेत. श्रीकांत धिवरे-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषन विभाग पुणे (पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे), उज्वला बनकर-पोलीस उपआयुक्त औरंगाबाद शहर(समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना), अशोक तानाजी विरकर यांना पदोन्नती देवून पोलीस अधिक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. शिला डी.साईल-उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई (पोलीस अधिक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई), दिपक विठ्ठलराव गिरे-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना (पोलीस उपआयुक्त औरंगाबाद शहर), विजय व्यंकटराव कबाडे-अपर पोलीस अधिक्षक वर्धा(पोलीस उपआयुक्त सोलापूर शहर), दिनेश जी.बारी-पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई (पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), अर्चना दत्तात्रय पाटील-पोलीस अधिक्षक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई(अपर पोलीस अधिक्षक हिंगोली), रत्नाकर ऐजीनाथ नवले-उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई (अपर पोलीस अधिक्षक युसीटीसी फोर्स-1 मुंबई), सागर रत्नकुमार कवडे-पोलीस अधिक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई(पोलीस अधिक्षक नक्षलवाद विरोधी पथक नागपूर), वैशाली ईश्र्वर कडूकर-पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 सोलापूर शहर(प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर), विक्रम महादेव साळी-पोलीस उपआयुक्त अमरावती शहर(पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक), संदीप जाधव-पोलीस उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग पुणे (पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे).
नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या 16 जणांना राज्य शासनाने पुढील प्रमाणे नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. प्रशांत होळकर-पोलीस अधिक्षक राज्य मानवी हक्क आयोग मुंबई, प्रसाद प्रल्हाद अक्कानुरू-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई, डी.के.पाटील भुजबळ-पोलीस अधिक्षक नक्षलवाद विरोधी पथक नागपूर, अरविंद साळवे-पोलीस अधिक्षक मुख्यालय, महामार्ग सुरक्षा पथक मुंबई, प्रमोद शेवाळे-कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुंबई, प्रशांत मोहिते-पोलीस उपआयुक्त नवी मुुंबई, निलेश आष्टेकर-उपाआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग पुणे, विजयकांत सागर-पोलीस उपआयुक्त नागपूर शहर, प्रशांत वाघुंडे-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नवी मुंबई, विशाल गायकवाड-पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, अजित बोऱ्हाडे-पोलीस उपआयुक्त सोलापूर शहर, दत्ता कांबळे-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला, ज्योती क्षीरसागर-पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक , योगेश चव्हाण-उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, निलेश मोरे-उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई, विजय पवार-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे, संदीप जाधव-पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे.
या वेगवेगळ्या आदेशांमध्ये अपर पोलीस अधिक्षक हिंगोली येथे झालेली मिलिंद मोहिते यांची बदली रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अर्चना पाटील यांना पाठविण्यात आले आहे. तसेच मिलिंद मोहिते यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे या पदावर नियुक्त झालेल्या राजलक्ष्मी सतिश शिवनकर यांची बदली रद्द करण्यात आली असून त्यांनाही प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. अभिजित सुरेश शिवथरे यांची 7 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे. तसेच 7 नोव्हेंबर रोजी दत्ता किशन नलावडे यांचीही बदली झाली होती. त्यांचीही बदली रद्द करून त्यांनाही प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण चार पोलीस अधिकारी आजही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
राज्य शासनाने केल्या 29 पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या