जिल्ह्यातील 4663 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

▪️4 लाख 26 हजार 31 पशुधनाचे लसीकरण 

नांदेड (प्रतिनिधी)- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 220 बाधित गावात 4 हजार 663 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.

आतापर्यंत 269 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 3 हजार 96 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 1304 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 26 हजार 31 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 140 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *