नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर महिन्यातील आपल्या सेवाकाळातील विहित वेळ पुर्ण करणारे दोन पोलीस उपनिरिक्षक आणि आणि तीन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात गृहपोलीस अधिक्षक अश्र्विनी जगताप यांनी या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना सन्मानपुर्वक निरोप दिला.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षक मोईनोद्दीन जहीरोद्दीन सय्यद-बिलोली अणि विठ्ठल गोविंदराव देशपांडे-पोलीस मुख्यालय, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भगवान अंगादास पेदे-पोलीस मुख्यालय, द्रोपदी रामकिशन रत्नपारखे-पोलीस मुख्यालय आणि सुधाकर शंकरराव एकलारे-जीपीयु यांनी 30 नोव्हेंबर रोजी आपल्या पोलीस सेवा काळाचा विहित वेळ पुर्ण केला.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी या सर्व सेवानिवृत्त अधिकारी आणि अंमलदारांना सन्मानपुर्वक निरोप दिला. याप्रसंगी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, करीमखान पठाण, कमल शिंदे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. पोलीस कल्याण विभागाच्या पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
