नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने ऍट्रॉसिटी कायदा खूनाच्या प्रकरणात जोडला नाही अशी बातमी सकाळी प्रकाशित केल्यानंतर या प्रकरणात तुरंत ऍट्रॉसिटी कायद्याची कलमे जोडण्यात आली. याप्रकरणातील तीन गुन्हेगारांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश श.ए. बांगर यांनी चार दिवस, अर्थात 6 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अक्षय साहेबराव जमदाडे, हर्षवर्धन उर्फ बाळा सुभाषराव लोहकरे आणि अमोल उर्फ भैय्या माधव चावरे या तिघांना टायरबोर्ड, देगलूर नाका येथे मारहाण झाली. या मारहाणीत शेख सोहेल उर्फ तलवारभाई शेख युसूफ (23), खुदबुद्दीन उर्फ शेख सोहेल शेख अनवर (22), शेख मजहर शेख युसूफ (25) या तिघांचा सहभाग होता. अशी तक्रार अक्षय साहेबराव जमदाडे यांनी जखमी अवस्थेत दिली. यातील अमोल उर्फ भैय्या माधव चावरे यांचा मृत्यू झाला. फिर्याद देतांना अक्षय जमदाडे यांनी आपण बौध्द समाजाचे आहोत असा उल्लेख आपल्या तक्रारीत केला असतांना सुध्दा नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्यात ऍट्रॉसिटी कायदा जोडलाच नाही. याबद्दलचे वृत्त आज सकाळी 11 वाजता वास्तव न्युज लाईव्हने प्रसिध्द केले. त्यानंतर या गुन्ह्यात ऍट्रॉसिटी कायदा जोडण्यात आला आणि त्याचा तपास पोलीस उपअधिक्षकांकडे गेला.
आज दुपारी पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात, पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, गजानन कदम, शेख रब्बानी, प्रकाश सुनकमवार आणि इतरांनी पकडलेल्या शेख सोहेल उर्फ तलवारभाई शेख युसूफ (23), खुदबुद्दीन उर्फ शेख सोहेल शेख अनवर (22), शेख मजहर शेख युसूफ (25) या तिघांना न्यायालयात हजर केले.
न्यायालयात पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सादर केलेला युक्तीवाद मान्य करत न्यायाधीश श.ए.बांगर यांनी शेख सोहेल उर्फ तलवारभाई शेख युसूफ (23), खुदबुद्दीन उर्फ शेख सोहेल शेख अनवर (22), शेख मजहर शेख युसूफ (25) या तिघांना 6 डिसेंबर पर्यंत अर्थात चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात आरोपींच्यावतीने शेख आमेर यांनी युक्तीवाद केला आहे.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2022/12/02/नांदेड-ग्रामीण-पोलिसांन-3/